Bollywood Sports movies : सरकारने सिनेमागृहे सुरू करण्यास परवानगी दिल्यापासून अनेक निर्माते त्यांच्या सिनेमांच्या प्रदर्शनाच्या तारखा जाहीर करत आहेत. सध्या क्रिडाविषयक सिनेमांची रांग लागली आहे. यात रणवीर सिंहच्या '83', शाहिद कपूरच्या 'जर्सी' आणि तापसी पन्नूच्या 'शाबास मिथू' सिनेमाचा समावेश आहे. 


रणवीर सिंहचा '83' सिनेमा 24 डिसेंबरला प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटाचे कथानक 1983 च्या क्रिकेट विश्वचषकाच्या विजयावर आधारित आहे. या सिनेमाचे दिग्दर्शन कबीर खानने केले आहे. या चित्रपटात दीपिका पदुकोण, पंकज त्रिपाठी, बोमन इराणी, साकिब सलीम, हार्डी संधू, ताहिर राज भसीन, जतीन सरना यांच्यादेखील मुख्य भूमिका आहेत. दीपिका या चित्रपटाची सहनिर्मातीदेखील आहे.


'जर्सी' सिनेमा येत्या 31 डिसेंबरला सिनेमागृहात प्रदर्शित होणार आहे. शाहिदचा 'जर्सी' सिनेमा क्रिकेटवर भाष्य करणारा असणार आहे. 'जर्सी' सिनेमात शाहिद कपूर एका क्रिकेटरचे पात्र साकारणार आहे. सिनेमात शाहिद कपूर एका माजी क्रिकेटपटूची भूमिका साकारत आहे. सिनेमात मृणाल ठाकूर शाहिदच्या पत्नीची भूमिका साकारत आहे. गौतम तिन्ननुरी यांनी या सिनेमाचे दिग्दर्शन केले आहे.


तापसी पन्नूची मुख्य भूमिका असलेल्या 'शाबास मिथू' सिनेमाची घोषणा झाल्यापासून सिनेमा चर्चेत आहे. भारतीय महिला क्रिकेट संघाची कर्णधार मिताली राजच्या आयुष्यावर आधारित हा सिनेमा असणार आहे. मिताली राज एक यशस्वी महिला क्रिकेटपटूंपैकी एक मानली जाते. बहुप्रतिक्षित  'शाबास मिथू' सिनेमा 4 फेब्रुवारी 2022 रोजी रुपेरी पडद्यावर झळकणार आहे.  


संबंधित बातम्या


Pushpa Box Office Day 1: अल्लू अर्जुन-रश्मिकाच्या 'पुष्पा'चा बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ; पहिल्याच दिवशीच कोट्यवधींची कमाई


Good Bye 2021 : प्रोडक्शन हाऊस, होम डेकोर ब्रँड, जाणून बॉलिवूड सेलिब्रिटींचा बिझनेस प्लॅन


Kangana Ranaut : जावेद अख्तर मानहानी प्रकरण, कंगना रनौतला न्यायालयाचा झटका


LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha