Zareen Khan : केंद्र सरकारने मुलींच्या विवाहाचं वय हे 18 वरुन 21 वर नेण्याचा निर्णय घेतला आहे. आता यावर वेगवेगळ्या प्रतिक्रिया उमटत आहेत. विवाहासाठी मुलींचे किमान वय 18 वरून 21 वर्ष करणारं विधेयक सरकार याच अधिवेशनात आणणार आहे. गुरुवारी केंद्रीय कॅबिनेटने या प्रस्तावाला मंजुरी दिली आहे.
बॉलिवूड अभिनेत्री जरीन खानदेखील लग्नाचे वय 18 वरून 21 वर्ष करण्याच्या सरकारच्या प्रस्तावाचं समर्थन केलं आहे.
जरीन खान म्हणाली,"लग्नाचे वय वाढवण्याचा निर्णय कौतुकास्पद आहे. प्रत्येक मुलीला लग्न केव्हा करायचे हे स्वतः ठरवण्याचा अधिकार असायला हवा. माझं वय 35 आहे. पण अद्याप माझे लग्न झालेले नाही. लग्नाचे वय वाढवण्याच्या प्रस्तावावरून राजकीय नेत्यांकडून आरोप प्रत्योरोप केले जात आहेत. त्यावर जरीन म्हणाली,"भारताला सर्वजण माता म्हणत असले तरी भारतातच महिलांबद्दल निंदनीय विधाने केली जातात".
AIMIM प्रमुख आणि खासदार असदुद्दीन ओवेसी यांनी केंद्र सरकारवर टीका केली आहे. '18 वर्ष झाल्यावर पंतप्रधान निवडू शकतो तर पार्टनर का नाही', असं त्यांनी म्हटलं आहे. ओवेसींनी म्हटलं आहे की,"18 वर्षाच्या वयात एक भारतीय व्यक्ती करारांवर सही करु शकतो, व्यवसाय सुरू करु शकतो, पंतप्रधान निवडू शकतो तर मग लग्न का करु शकत नाही?" असा सवाल त्यांनी केला.
समाजवादी पक्षाचे खासदाराचे वादग्रस्त वक्तव्य
केंद्र सरकारच्या या निर्णयावर समाजवादी पक्षाचे खासदार शफीफ उर रहमान वर्क यांनी वादग्रस्त वक्तव्य केलं आहे. मुलींच्या विवाहाचे वय वाढवल्याने त्या अधिक बिघडतील असं त्यांनी म्हटलं आहे. समाजवादी पक्षाचे खासदार शफीफ उर रहमान वर्क यांच्या या वक्तव्याचा अनेकांनी निषेध व्यक्त केला आहे. मोदी सरकारने मुलींना आता संवैधानिक अधिकार द्यायची तयारी केली असताना सपाच्या खासदारांचे हे वक्तव्य गुलामगिरीचे द्योतक आहे, मुलींनी नेहमी गुलामीत ठेवण्याची मानसिकता यावरुन स्पष्ट होते असं मत राज्यसभेचे खासदार हरनाथ सिंह यांनी व्यक्त केलं.
संबंधित बातम्या
'18 वर्ष झाल्यावर पंतप्रधान निवडू शकतो तर पार्टनर का नाही', मुलींचं लग्नाचं वय वाढवण्याला ओवेसींचा विरोध
Corona Positive करीना कपूर आणि अमृता अरोरासोबतच्या पार्टीनंतर निष्काळजीपणे फिरतेय आलिया भट्ट? आता झाला मोठा खुलासा
Pushpa The Rise Movie Review : 'रक्तचंदन तस्करांचं टोळीयुद्ध'
LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha