Good Bye 2021 : आजकाल बॉलिवूड (Bollywood) सेलिब्रिटींचा कल व्यवसाय करण्याकडे वाढला असल्याचे पाहायला मिळतेय. अनेक सेलिब्रिटी आपल्या करिअरसह व्यवसाय क्षेत्रातही नावलौकिक कमवत आहेत. सुनिल शेट्टी, अजय देवगण, कतरिना कैफ सारखे अनेक सेलिब्रिटी व्यवसाय क्षेत्रात नावाजले आहेत. यंदाच्या वर्षी यामध्ये आणखी काही नावे जोडली गेली आहेत. आलिया भट्ट (Alia Bhatt), तापसी पन्नू (Tapasee Pannu), एकता कपूर (Ekta Kapoor) पासून रितेश देशमुख (Riteish Deshmukh) पर्यंत 2021 मध्ये नवीन व्यवसाय सुरू केले.


आलिया भट्ट (Alia Bhatt) सध्या चित्रपटांच्या चित्रीकरणामध्ये व्यस्त आहे. तिचे संपूर्ण वेळापत्रक सध्या व्यस्त असल्याचे बोलले जात आहे. असे असूनही, आलियाने यावर्षी तिचे नवीन प्रॉडक्शन हाऊस लाँच केले आहे. तिच्या प्रोडक्शन हाऊसचं नाव 'इटर्नल सनशाईन प्रॉडक्शन' (Eternal Sunshine) आहे.


एकता कपूर (Ekta Kapoor) ने होम डेकोर ब्रँड  (Home Decor Brand) लाँच केला आहे. एकता कपूरच्या होम डेकोर ब्रँडचे नाव 'एक' असे आहे. रितेश देशमुख (Riteish Deshmukh) आणि जेनेलिया डिसूझा (Genelia Deshmukh) यांनी इमॅजिन मीट्स (Imagine Meats) ब्रँड लाँच केला आहे. मांसाहारी सारखी चव असणारे हे शाकाहारी पदार्थ खूप प्रसिद्ध झाले आहेत.


कंगना राणौतने (Kangana Ranaut) हिमाचल प्रदेशातील मनाली (Manali) येथे स्वतःचा कॅफे (Cafe) उघडला आहे. कंगनाने तिच्या कॅफेचे नाव 'ड्रीम वेंचर' (Dream Venture) ठेवले आहे.
तापसी पन्नूने (Tapasee Pannu) यावर्षी तिचे प्रोडक्शन हाऊस सुरु केले आहे. 'रश्मी रॉकेट' हा त्यांच्या प्रोडक्शन हाऊसचा पहिला चित्रपट होता. तापसीच्या प्रोडक्शन हाऊसचे नाव आऊटसाईडरर्स फिल्म (Outsiders Films) आहे.


महत्त्वाच्या बातम्या :



LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोड पाहा लाईव्ह - ABP Majha