Mangesh Desai : एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी मुख्यमंत्री, तर देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी उपमुख्यमंत्री पदाची नुकतीच शपथ घेतली आहे. 30 जूनला त्यांचा शपथविधी पार पडला. या नव्या मंत्र्यांना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह मनोरंजनसृष्टीतील मंडळीदेखील शुभेच्छा देत आहेत. आता 'धर्मवीर'चा निर्माता मंगेश देसाईने (Mangesh Desai) खास पोस्ट लिहित एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्री झाल्याबद्दल शुभेच्छा दिल्या आहे.


मंगेश देसाईने लिहिले आहे, वागळे इस्टेटमध्ये एका कार्यक्रमाला भेटलो होतो 2007 साली. तुम्ही आमदार होतात त्या वेळी. तुम्हाला पहिल्यांदा भेटलो होतो. तसा तुम्हाला बघून घाबरलो होतो. पण तुम्ही खूप छान बोललात. सचिन जोशीला मला तुमचं व्हिझिटींग कार्ड द्यायला लावलत आणि काहीही मदत लागली तर सांगा असं आवर्जून म्हणालात. माझ्या सारख्या सामान्य कलाकाराला मदत लागणारच. तीही तुम्ही एका मिनटात केलीतही आणि त्या मदतीचे आभार म्हणून मी तुम्हाला तुमचंच एक भित्तीचित्र भेट म्हणून द्यायला आलो होतो तेव्हाचे तुमचे शब्द मला आठवतात "हे कशाला ?आपण मित्र आहोत मंगेश आणि खरंच मित्र झालात". 






मंगेश देसाईने आणखी एक प्रसंग शेअर करत लिहिले आहे,"सगळे तुम्हाला नमस्कार करायचे, मी पण केला एकदा. तेव्हा "हे करत जाऊ नका. आपण मित्र आहोत."असच म्हणालात आणि खरंच मित्र झालात आणि नंतर जसजसे वर्ष सरत गेले तसे मोठ्या भावासारखे पाठीशी उभे राहिलात, प्रत्येक प्रसंगात. त्याबद्दल हृदयपूर्वक आभार साहेब".


मंगेश देसाईने पुढे लिहिले आहे,"माझी 2013 पासून मनात असलेली दिघे साहेबांवरच्या चरितपटाची मनोकामना पूर्ण करून माझी निर्माता म्हणून ओळख घडवलीत. रक्ताच्या नात्यापेक्षा जास्त जवळ केलंत त्याबद्दल मानावे तेवढे आभार कमीच आहेत. आज तुम्ही महाराष्ट्र्राचे मुख्यमंत्री झालात. प्रत्येकाच्या हाकेला धावून जाणारा, माणसाशी माणुसकिने वागणारा,विरोधकांना नमवणारा आणि क्षमा करणारा, अहोरात्र काम करणारा मी जवळून बघितलेला एक समाजकारणी मुख्यमंत्री झाला याचा खूप अभिमान वाटतो. आपल्याला उदंड आयुष्य लाभो, महाराष्ट्र घडवण्यात तुमचा मोलाचा वाट राहो हीच दत्त गुरूंकडे प्रार्थना. जय हिंद...जय महाराष्ट्र."


संबंधित बातम्या


Eknath Shinde : 'धर्मवीर'ची भूमिका साकारणाऱ्या प्रसाद ओकने एकनाथ शिंदेंना दिल्या शुभेच्छा; मनोरंजनसृष्टीतून शुभेच्छांचा वर्षाव


Kangana Ranaut : ‘एक रिक्षाचालक ते महाराष्ट्राचे मुख्यमंत्री...’, कंगना रनौतकडून मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना खास शुभेच्छा!