Ayushmann Khurrana In Doctors G : डॉक्टर्स दिनानिमित्त आयुष्मान खुरानाने (Ayushmann Khurrana) त्याच्या चाहत्यांना एक खास सरप्राईज दिलं आहे. त्याचा आगामी सिनेमा 'डॉक्टर जी'च्या (Doctors G) टीमने सिनेमातील त्याचा लूक आऊट केला आहे. जंगली पिक्चर्स निर्मित हा सिनेमा असून या सिनेमाचे दिग्दर्शन अनुभूती कश्यप यांनी केलं आहे. 


'डॉक्टर जी' या कॉमेडी ड्रामा सिनेमात आयुष्मान खुराना पहिल्यांदाच स्त्रीरोग तज्ज्ञाची भूमिका साकारत आहे. ज्यामध्ये बॉलिवूड अभिनेत्री रकुल प्रीत सिंह आणि ज्येष्ठ अभिनेत्री शेफाली शाह त्याच्यासोबत महत्त्वाच्या भूमिकांमध्ये दिसणार आहे.


डॉक्टर्स दिनानिमित्त आयुष्मान खुरानाने सर्व मेहनती डॉक्टर्सना शुभेच्छा दिल्या आहेत. ज्यांनी आपले आयुष्य इतरांच्या सेवेसाठी समर्पित केलं आहे. या लुकसोबतच त्याने आपल्या चाहत्यांना डॉक्टर जी मधील 'जी' म्हणजे काय? याची देखील झलक सादर केली आहे.






आयुष्मान खुरानाने आपल्या सोशल मीडियावर सिनेमातील आपल्या लुकची लेटेस्ट झलक शेयर करताना लिहिले की, 'डॉक्टर जी'चे निर्माते हा दिवस सिनेमातील आयुष्मान खुरानाच्या व्यक्तिरेखेच्या या नवीन फोटोसह साजरा करण्याची अशी आशा करत आहेत. हा सिनेमा आयुष्मान खुरानाच्या बहुप्रतिक्षित प्रोजेक्टपैकी एक आहे. डॉक्टर जी व्यतिरिक्त, जंगली पिक्चर्सकडे 2022 मध्ये 'वो लड़की है कहां?', 'डोसा किंग', 'उलज' आणि 'क्लिक शंकर' सारख्या थ्रिलर्सची मोठी यादी तयार आहे.


संबंधित बातम्या


July Upcoming Movies: ‘रॉकेटरी’ ते ‘शाब्बास मिथू’, जुलै महिन्यात प्रेक्षकांना मिळणार मनोरंजनाची मेजवानी!


Zol Zaal : एक-दोन नव्हे तब्बल 22 कलाकारांसह हास्याचा बूस्टर डोस! 'झोलझाल' चित्रपट संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित