Aryan Khan : क्रूझ ड्रग्स प्रकरणात नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोकडून (NCB) क्लीन चिट मिळालेला बॉलिवूड अभिनेता शाहरुख खानचा (Shah Rukh Khan) मुलगा आर्यन (Aryan Khan) याने गुरुवारी विशेष एनडीपीएस कोर्टात आपला पासपोर्ट परत मिळावा यासाठी याचिका दाखल केली. याप्रकरणी न्यायालयाने एनसीबीला उत्तर दाखल करण्याचे निर्देश दिले आहेत. या प्रकरणाच्या सुनावणीसाठी 13 जुलैची तारीख निश्चित करण्यात आली आहे.
मीडिया नुसार, आर्यन खानने 30 जून रोजी पासपोर्ट परत मिळावा यासाठी विशेष न्यायालयात याचिका दाखल केली आहे. आर्यन खानला गेल्या वर्षी ऑक्टोबरच्या सुरुवातीला NCB ने हाय-प्रोफाइल ड्रग्ज प्रकरणात अटक केली होती. परंतु, एनसीबीने मे महिन्यात दाखल केलेल्या आरोपपत्रात आरोपी म्हणून त्याचे नाव नमूद केलेले नाही. या प्रकरणात त्याला नुकतीच नार्कोटिक कंट्रोल ब्युरोकडून (NCB) क्लीन चिटही मिळाली आहे. आपल्या याचिकेत आर्यनने न्यायालयाला विनंती केली आहे की, एनसीबीच्या आरोपपत्रात त्याचे नाव नाही, त्यामुळे त्याचा पासपोर्ट परत देण्यात यावा. या प्रकरणाबाबत विशेष न्यायालयाने एनसीबीला उत्तर दाखल करण्याचे निर्देश दिले असून, पुढील सुनावणी 13 जुलैला होणार आहे.
आर्यन खानला भोगावा लागला तुरुंगवास
मुंबईहून गोव्याला जाणाऱ्या कॉर्डिलिया क्रूझवर 3 ऑक्टोबर 2021 रोजी एनसीबीकडून मोठ्या प्रमाणात ड्रग्स जप्त करण्यात आले होते. त्यात सुपरस्टार शाहरुख खानचा (Shahrukh Khan) मोठा मुलगा आर्यन खानसह (Aryan Khan) त्याचा बालमित्र अरबाज मर्चंट आणि मुनमुन धमेचा यांच्यासह अन्य 20 जणांना अटक करण्यात आली होती. त्यानंतर आर्यनला बरेच दिवस तुरुंगात राहावं लागलं होतं. हे प्रकरण देशभरात गाजलं होतं. आता आर्यन खानसह सहा जणांना क्लीनचिट मिळाली आहे.
या प्रकरणात आर्यन खान, अरबाज मर्चेंट, मुनमुन धमेचा, विक्रांत छोकर, मोहक जैसवाल, इशमित सिंह, गोमती चोप्रा, नूपुर सतीजा, अब्दुल कादर शेख, श्रेयश नायर, मनीष राजगरिया, अविन साहू, समीर सिंघल, मानव सिंघल, भास्कर अरोरा, गोपाल आनंद, अचीत कुमार, चीनेडु इग्वे, शिवराज हरिजन, ओकोरो उजेओमा या सर्वांना या प्रकरणात अटक करण्यात आली होती.
संबंधित बातम्या