Jhund Collection Day 2 : 4 मार्च रोजी अमिताभ बच्चन (Amitabh Bachchan) यांचा मोस्ट अवेटेड चित्रपट 'झुंड' (Jhund) रिलीज झाला. अपेक्षेनुसार या चित्रपटाने शुक्रवारी म्हणजेच पहिल्याच दिवशी बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई केली. वास्तवाचे चित्रण करणारा हा चित्रपट लोकांच्या पसंतीस उतरला आहे आणि कदाचित त्यामुळेच चित्रपटाने दुसऱ्या दिवशीही कोटींचा टप्पा गाठला आहे.  


या चित्रपटाने दुसऱ्या दिवशी अर्थात शनिवारी 2.10 कोटींचा व्यवसाय केला आहे. या चित्रपटातील अमिताभ बच्चन यांची भूमिका लोकांना पसंत पडत आहे. चित्रपटाने पहिल्या दिवशी 1.5 कोटींचा व्यवसाय केला होता. अमिताभ बच्चन यांनी आपल्या दमदार अभिनयाने पुन्हा एकदा लोकांची मने जिंकली आहेत असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही.


 







आमिरने केली शिफारस!


‘झुंड’ (Jhund) या चित्रपटाची शिफारस आमिरनेच बिग बींकडे केली होती आणि त्यांना त्यासाठी तयार देखील केले होते. ‘झुंड’ चित्रपटाची स्क्रिप्ट आमिरने ऐकली आणि त्याने तो इतका प्रभावित झाला की, अमिताभ बच्चन यांना चित्रपट करण्याची शिफारस केली आणि ते या भुमिकेसाठी कसे योग्य आहेत, हे पटवूनही दिले. अमिताभ हे झुंडसाठी एक परिपूर्ण निवड आहेत, याची आमिरला खात्री होती.


अमिताभ बच्चन यांनी या चित्रपटात क्रीडा प्रशिक्षक विजय बारसे म्हणून वेगळी छाप सोडली आहे. 'स्लम सॉकर' या स्वयंसेवी संस्थेचे संस्थापक विजय बारसे यांच्या जीवनावरून हा चित्रपट प्रेरित आहे. विजय बारसे यांनी त्यांच्या एनजीओच्या माध्यमातून झोपडपट्टीतील मुलांमध्ये फुटबॉल हा ग्लोबल खेळ लोकप्रिय केला आणि त्यांना खेळण्याची हिंमत देऊन त्यांचे जीवन समृद्ध केले.


दिग्दर्शक नागराज पोपटराव मंजुळे यांनी झुंडची कथा, पटकथा आणि संवाद लिहिले आहेत. इतकंच नाही, तर ते या चित्रपटातही अभिनय करताना दिसले आहेत. ‘झुंड’ चित्रपटात अमिताभ बच्चन यांच्यासोबतच ‘सैराट’ फेम आकाश ठोसर आणि रिंकू राजगुरु या कलाकारांनी देखील महत्त्वपूर्ण भूमिका साकारल्या आहेत. ‘झुंड’ हा एक स्पोर्ट्स ड्रामा चित्रपट आहे. ‘झुंड’ची निर्मिती भूषण कुमार, कृष्ण कुमार, सविता राज यांनी केली आहे. अजय-अतुल या लोकप्रिय जोडीने संगीताची धुरा सांभाळली आहे.


हेही वाचा :



LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha