South Movie Sequels : दाक्षिणात्य सिनेसृष्टीसाठी 2022 हे वर्ष खूप खास आहे. या वर्षात अनेक दाक्षिणात्य सिनेमांनी बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालता. दाक्षिणात्य सिनेमांसमोर बॉलिवूडचे बिग बजेट सिनेमेदेखील मागे पडले. गेल्या काही दिवसांत 'पुष्पा द राइज', 'आरआरआर' आणि 'केजीएफ 2' सारखे अनेक दाक्षिणात्य सिनेमे रिलीज झाले. लवकरच या सिनेमांचा सीक्वेल प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. 


केजीएफ 3


14 एप्रिल 2022 रोजी रिलीज झालेल्या केजीएफच्या दुसऱ्या भागाने सिनेमागृहात चांगलाच धुमाकूळ घातला. सिनेमातील रॉकी भाई प्रेक्षकांच्या पसंतीस उतरला. आता चाहते या सिनेमाच्या तिसऱ्या भागाची प्रतीक्षा करत आहेत. सध्या केजीएफचे दिग्दर्शक प्रशांत नील त्यांच्या आगामी सालार सिनेमाच्या शूटिंगमध्ये व्यस्त आहेत. 'केजीएफ 3' हा सिनेमा 2025 मध्ये रिलीज होणार असे म्हटले जात आहे. 


पुष्पा 2


अल्लू अर्जुन आणि रश्मिका मंदानाचा ‘पुष्पा: द राइज’ हा सिनेमा मागील वर्षात सिनेमागृहात रिलीज झाला होता. साऊथसह या सिनेमाने हिंदी सिनेसृष्टीतही धमाका केला होता. लवकरच या सिनेमाचा सीक्वेल प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. 


बाहुबली 3


बाहुबलीच्या तिसऱ्या भागाची प्रेक्षक गेल्या अनेक दिवसांपासून प्रतीक्षा करत आहेत. एसएस राजामौली दिग्दर्शित या सिनेमातील प्रभासच्या अभिनयाचे चाहत्यांनी कौतुक केले होते. सध्या प्रभास आणि राजामौली या सिनेमाच्या तिसऱ्या भागावर काम करत आहेत, असे म्हटले जात आहे. अद्याप यासंदर्भात कोणतीही अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही. 


विक्रम


दाक्षिणात्य अभिनेता कमल हासनच्या 'विक्रम'ने जगभरात बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातला आहे. 'विक्रम'च्या दोन्ही भाग प्रेक्षकांच्या पसंतीस उतरल्याने प्रेक्षक विक्रमच्या तिसऱ्या भागाची प्रतीक्षा करत आहेत. त्यामुळे निर्मात्यांनी विक्रमचा पुढचा भाग रिलीज करण्याचा निर्णय घेतला आहे. 


कॅथी


'कॅथी' या सिनेमाने बॉक्स ऑफिसवर चांगलीच कमाई केली होती. आता या सिनेमाचा तिसरा भाग लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. 


संबंधित बातम्या


Saas Bahu Achaar Pvt. Ltd : पंचायतच्या निर्मात्यांनी केली आगामी वेब सीरिजची घोषणा; अमृता सुभाष मुख्य भूमिकेत


Bhool Bhulaiyaa 2 : रिलीजच्या एक महिन्यानंतरदेखील बॉक्स ऑफिसवर 'भूल भुलैया 2'चा दबदबा; जगभरात केली 230 कोटींची कमाई


Atal Bihari Vajpayee : अटल बिहारी वाजपेयी यांच्या आयुष्यावर येतोय सिनेमा; 99 व्या जयंतीला होणार रिलीज