Main Rahoon Ya Na Rahoon Yeh Desh Rehna Chahiye - Atal : देशाचे माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजयेपी यांच्या आयुष्यावर आधारित सिनेमा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या सिनेमाचे नाव 'मैं रहूं या न रहूं ये देश रहना चाहिए-अटल' (Main Rahoon Ya Na Rahoon Yeh Desh Rehna Chahiye - Atal) असे आहे. मंगळवारी निर्मात्यांनी या सिनेमाची घोषणा करत मोशन पोस्टर रिलीज केलं आहे. हा सिनेमा हिंदी आणि इंग्रजी या दोन भाषांमध्ये प्रदर्शित होणार आहे.
'मैं रहूं या न रहूं ये देश रहना चाहिए-अटल' हा सिनेमा पुढील वर्षात प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. सिनेमाची घोषणा करत निर्मात्यांनी स्पष्ट केलं आहे की हा सिनेमा अटल बिहारी वाजपेयी यांच्या 99 व्या जयंतीनिमित्त रिलीज करण्यात येणार आहे. 25 डिसेंबर 2023 रोजी अटल बिहारी वाजयेंची जयंती आहे. मोशन पोस्टमध्ये अटल बिहारी वाजपेयींच्या भाषणातील काही वाक्य ऐकायला मिळत आहेत.
'मैं रहूं या न रहूं ये देश रहना चाहिए-अटल' हा सिनेमा पेंग्विन रँडम हाऊस इंडियाच्या सर्वाधिक विकल्या गेलेल्या 'द अनटोल्ड वाजपेयी: पॉलिटिशियन अँड पॅराडॉक्स' या पुस्तकावर आधारित आहे. लवकरच या सिनेमाच्या शूटिंगला सुरुवात होणार आहे. मोशन पोस्टर रिलीज झाल्यामुळे प्रेक्षक सिनेमाची प्रतीक्षा करत आहेत.
अटल बिहारी वाजपेयी कोण आहेत?
अटल बिहारी वाजपेयी यांचा जन्म 25 डिसेंबर 1924 रोजी झाला. तर 16 ऑगस्ट 2018 रोजी त्यांचे निधन झाले. टलबिहारी वाजपेयीजी हे भारताचे एक अनुकरणीय नेते, प्रसिद्ध कवी, लेखक, भारताचे माजी पंतप्रधान, उत्कृष्ट वक्ता आणि मानवतावादी राजकारणी होते. तीन वेळा ते पंतप्रधान झाले होते.
संबंधित बातम्या