Rashmika Mandanna Vijay Deverakonda Engagement : अभिनेत्री रश्मिका मंदाना (Rashmika Mandanna) आणि विजय देवरकोंडा (Vijay Deverakonda) यांच्या रिलेशनशिपची सध्या चर्चा आहे. गेल्या काही दिवसांपासून त्यांचं लग्न आणि साखरपुड्याच्या चर्चांना सुरुवात झाली आहे. फेब्रुवारी महिन्यात त्यांचा साखरपुडा होणार असल्याच्या बातम्या समोर आल्या होत्या. रश्मिका मंदानासोबतच्या साखरपुड्याच्या बातम्यांवर विजय देवरकोंडाने अखेर मौन सोडलं आहे.


लाइफस्टाईल एशियाला दिलेल्या मुलाखतीत विजय देवरकोंडा म्हणाला,"रश्मिका आणि माझा येत्या फेब्रुवारी महिन्यात साखरपुडा आणि लग्न होणार असल्याच्या अफवा आहेत. अनेकदा मला अशा अफवांचा सामना करावा लागतो. माध्यमांना फक्त माझ्या लग्नाची प्रतीक्षा आहे".


रश्मिका मंदाना अन् विजय देवरकोंडा लिव्ह-इनमध्ये?


हिंदुस्ताना टाइम्सने रश्मिका मंदाना आणि विजय देवरकोंडा लिव्ह-इन मध्ये असल्याचा दावा केला होता. पण या फक्त चर्चा असल्याचं नंतर समोर आलं. दोघांच्या जवळच्या एका व्यक्तीने हिंदुस्तान टाइम्सला दिलेल्या माहितीनुसार, रश्मिका आणि विजयला त्यांचं नातं अधिकृत करायचं नाही. सध्या ते एकमेकांना समजून घेण्याचा प्रयत्न करत आहेत. अद्याप त्यांनी लग्न किंवा साखरपुडा करण्याचा विचार केलेला नाही. सध्या करिअरवर लक्ष केंद्रीत करण्याचा त्यांचा प्रयत्न आहे". 


रश्मिका आणि विजय हे मनोरंजनसृष्टीतलं चर्चेत असणारं कपल आहे. गेल्या अनेक दिवसांपासून ते एकमेकांना डेट करत आहेत. 'गीता गोविंदम' या सिनेमाच्या शूटिंगदरम्यान रश्मिका आणि विजयची पहिली भेट झाली. या सिनेमाच्या शूटिंगदरम्यान त्यांची चांगली मैत्री झाली आणि ते एकमेकांना डेट करू लागले. बॉक्स ऑफिसवर हा सिनेमा गाजला. त्यानंतर 'डियर कॉम्रेड' या सिनेमात ते एकत्र झळकले. दोघांना आजवर अनेकदा एकत्र स्पॉट करण्यात आलं आहे. पण त्यांनी त्यांचं नातं गुलदस्त्यातच ठेवलं आहे. पण तरीही त्यांच्या अफेरच्या चर्चा मात्र चाहत्यांचं लक्ष वेधून घेतात.


रश्मिका मंदाना आणि विजय देवरकोंडाच्या आगामी सिनेमांबद्दल जाणून घ्या...


रश्मिका मंदाना आणि विजय देवरकोंडा हे मनोरंजनसृष्टीतील आघाडीचे कलाकार आहेत. दोघेही आपापल्या कलाकृतींच्या माध्यमातून प्रेक्षकांची मने जिंकतात. रश्मिका लवकरच 'पुष्पा 2' (Pushpa 2) या सिनेमाच्या माध्यमातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या सिनेमात ती अल्लू अर्जुनसोबत स्क्रीन शेअर करताना दिसेल. सध्या ती या सिनेमाचं शूटिंग करत आहे. 15 ऑगस्ट 2024 रोजी हा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला येईल. विजयचे 'फॅमिली स्टार' 'वीडी 12' हे सिनेमे प्रेक्षकांच्या भेटीसाठी सज्ज आहेत.


संबंधित बातम्या


Rashmika Mandanna : अखेर तो सापडलाच! रश्मिकाचा डीपफेक बनवणाऱ्या आरोपीला दिल्ली पोलिसांनी ठोकल्या बेड्या