MTV Roadies Season 18 : छोट्या पडद्यावरील लोकप्रिय 'रोडीज'च्या (Roadies) शूटिंगला अभिनेता सोनू सूदने (Sonu Sood) सुरुवात केली आहे. 'रोडीज' हा अॅडव्हेंचर रिअॅलिटी शो गेली अनेक वर्ष एमटीव्हीवर सुरू आहे. हा शो नेहमीच तरुणाईच्या पसंतीस पडतो. 
पण आता सोनू सूद हा शो होस्ट करणार असल्याने चाहते उत्सुक आहेत. 


चाहत्यांसोबत सोनू सूददेखील 'रोडीज'चा साहसी प्रवास अनुभवण्यासाठी उत्सुक आहे. या शो चे शूटिंग दक्षिण आफ्रिकेत होत आहे. 18 वर्षे रणविजय सिंह रोडीज होस्ट करत होता. पण आता सोनू सूद होस्ट करत असलेल्या  'रोडीज'चे नवे पर्व मार्च 2022 मध्ये प्रेक्षकांच्या भेटीला येऊ शकते, अशी शक्यता वर्तवली जात आहे.





सोनू सूदचे आगामी प्रोजेक्ट
सोनू सूदचे अनेक प्रोजेक्ट सध्या पाईपलाईनमध्ये आहेत. सोनू सूद लवकरच चंद्रप्रकाश द्विवेदीच्या 'पृथ्वीराज' सिनेमात दिसणार आहे. या सिनेमात खिलाडी अक्षय कुमार मुख्य भूमिकेत आहे. सोनू सूदचा आगामी 'कोरताला' सिनेमादेखील लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. 


संबंधित बातम्या


Farhan-Shibani : फरहान-शिबानीच्या लग्नानंतर अभिनेत्याची पहिली पत्नी म्हणाली...


Trending : 'कच्चा बदाम', 'बचपन का प्यार'पासून 'ढिंच्याक पूजा'पर्यंत 'हे' कलाकार रातोरात झाले स्टार


Pawankhind : जय शिवराय! दुसऱ्या आठवड्यातही 'पावनखिंड' सिनेमाचा बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ, कोट्यवधींची कमाई


LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha