Judaai  Movie : 90च्या दशकात अभिनेता अनिल कपूर (Anil Kapoor) आणि अभिनेत्री श्रीदेवीच्या (Sridevi) जोडीने बॉलिवूडला अनेक हिट चित्रपट दिले. या काळात दोघांनीही अनेक चित्रपटात काम केले असेल, पण श्रीदेवीची लोकप्रियता अनिल कपूरपेक्षा जास्त होती. यामुळेच प्रत्येक कलाकार श्रीदेवीसोबत काम करण्यास तयार होता. मात्र, असे असतानाही अनिल कपूरने 'जुदाई' (Judaai ) चित्रपटात श्रीदेवीसोबत काम करण्यास नकार दिला होता.

Continues below advertisement

बरोबर 25 वर्षांपूर्वी 1997 मध्ये याच दिवशी अनिल कपूर आणि श्रीदेवीचा ‘जुदाई’ हा चित्रपट प्रदर्शित झाला होता. या चित्रपटात अभिनेता अनिल कपूर, श्रीवेदी आणि उर्मिला मातोंडकर दिसले होते. त्या काळातील या हिट चित्रपटाच्या प्रदर्शनाला आज 25 वर्षे पूर्ण झाली आहेत. मात्र, अनिल कपूर या चित्रपटाट काम करण्यासाठी तयार नव्हता, हे फार कमी लोकांना माहीत असेल. नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीदरम्यान त्यांनी याचा खुलासा केला आहे.

... म्हणून नाकारला होता चित्रपट!

Continues below advertisement

श्रीदेवीसोबत चित्रपट न करण्यामागचे कारण स्पष्ट करताना अनिल म्हणाला की, 'मी चित्रपटाला नाही म्हणत राहिलो कारण मी माझ्या पात्राशी मानाने जोडला जात नव्हतो. रूप की रानी चोरों का राजा फ्लॉप झाल्यानंतर आम्ही आर्थिकदृष्ट्या कठीण काळातून जात होतो. त्यामुळे माझ्यावर खूप दबाव होता. शेवटी मी फक्त माझ्या कुटुंबासाठी या चित्रपटाला हो म्हटलं.’

चित्रपट हिट ठरला!

अनिल कपूरचा ‘जुदाई’ हा चित्रपट हिट ठरला आणि त्याला लोकांचा खूप चांगला प्रतिसाद मिळाला. यानंतर अनिल कपूरला या चित्रपटात काम करण्याच्या त्याचा निर्णयाचा आनंद झाला. याबद्दल बोलताना त्याने सांगितले की, श्रीदेवी आणि उर्मिलासोबत काम करताना मला खूप आनंद झाला. त्याचवेळी प्रेक्षकांना अनिल कपूरची श्रीदेवीसोबतची जोडी पुन्हा एकदा पाहायला मिळाली. या दोघांनी मिळून ‘मिस्टर इंडिया’, ‘लम्हे’, ‘लाडला’, ‘रूप की रानी चोरों का राजा’, ‘जुदाई’ असे अनेक सुपरहिट चित्रपट दिले आहेत.

हेही वाचा :

LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha