Pawankhind Movie : 'पावनखिंड' (Pawankhind) सिनेमा प्रेक्षकांच्या पसंतीस पडत आहे. दुसऱ्या आठवड्यातही हा सिनेमा बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालतो आहे. या सिनेमाने पहिल्या आठवड्यात 12.17 कोटींची कमाई केली आहे. तर विकेंण्डला शुक्रवारी 1.02 कोटी, शनिवारी 1.55 कोटी आणि शनिवारी 1.97 कोटींची कमाई केली आहे. त्यामुळे आतापर्यंत या सिनेमाने बॉक्स ऑफिसवर 16.71 कोटींचा गल्ला जमवला आहे. 


18 फेब्रुवारीला  'पावनखिंड' सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. या सिनेमाचे लेखन-दिग्दर्शन दिग्पाल लांजेकर यांनी केले आहे. सिनेमा प्रदर्शित झाल्याच्या पहिल्या दिवसापासून सिनेमा प्रेक्षकांच्या पसंतीस पडत आहे. अनेक सिनेमागृहांबाहेर हाऊसफुल्लचे बोर्ड झळकत आहेत. 


50 टक्क्यांची आसनक्षमता तसेच बॉलिवूडचे बिग बजेट सिनेमे प्रदर्शित झालेले असतानादेखील 'पावनखिंड' सिनेमाने चांगलीच कमाई केली आहे. या सिनेमाला मिळणाऱ्या प्रतिसादामुळे प्रेक्षकांचे मराठी सिनेसृष्टीवर किती प्रेम आहे, हे पुन्हा एकदा अधोरेखित झाले आहे.






बाजीप्रभूंची गाथा सांगणाऱ्या 'पावनखिंड' सिनेमाला प्रेक्षकांचा उदंड प्रतिसाद लाभत आहे. अभिनेते अजय पूरकर यांनी या सिनेमात बाजीप्रभू देशपांडेंची भूमिका साकारली आहे. शिवराज अष्टक या संकल्पनेअंतर्गत 'फर्जंद' आणि 'फत्तेशिकस्त' या चित्रपटांनंतर लेखक-दिग्दर्शक-अभिनेता दिग्पाल लांजेकर यांनी स्वराज्याच्या वाटेवरील तिसरं सुवर्णपान 'पावनखिंड' चित्रपटाच्या निमित्ताने उलगडलं आहे.


संबंधित बातम्या


Dhaakad : कंगना रनौतच्या अ‍ॅक्शन थ्रिलर 'धाकड'ची रिलीज डेट जाहीर


JALSA First Look Poster : ओटीटीवर होणार मनोरंजनाचा धमाका, विद्या बालनचा ‘जलसा’ लूक प्रेक्षकांच्या भेटीला!


Jhund : ...जेव्हा ‘महानायक’ प्रत्यक्ष भेटले! रिंकू-आकाशने शेअर केला ‘झुंड’चा अनुभव


LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha