Sonam Kapoor In King Charles Coronation: ब्रिटनचे 40 वा  सम्राट म्हणून किंग चार्ल्स III  (King Charles Coronation) यांच्या राज्याभिषेक सोहळ्याला जगभरातील पाहुणे उपस्थित राहणार आहेत. तसेच भारतातील काही लोक देखील या राज्याभिषेक सोहळ्याला उपस्थित राहणार आहेत.  बॉलिवूड अभिनेत्री सोनम कपूरलाही (Sonam Kapoor) किंग चार्ल्स III  यांच्या राज्याभिषेक सोहळ्यामध्ये  सहभागी होण्याची संधी मिळाली आहे. तसेच मुंबईचे दोन डबेवाले देखील या कार्यक्रमामध्ये हजेरी लावणार आहेत. 


एका रिपोर्टनुसार, सोनमरला किंग चार्ल्स III यांच्या राज्याभिषेक कार्यक्रमात खास स्पोकन वर्ड पीस देण्यासाठी आमंत्रित करण्यात आले आहे. याबद्दल अभिनेत्रीने पोस्टमध्ये लिहिले की, "या समारंभासाठी कॉमनवेल्थ व्हर्च्युअल कॉयरमध्ये सामील होण्याचा मला सन्मान वाटतो." युनायटेड किंगडमच्या विंडसर कॅसल येथे 7 मे रोजी सोनम स्टीव्ह विनवूड आणि विशेष कॉमनवेल्थ व्हर्च्युअल गायकांचा इन्ट्रो देणार आहे.


मुंबईमधील दोन डबेवाले देखील होणार सामील



किंग चार्ल्स III यांच्या राज्याभिषेक  या कार्यक्रमात मुंबईतील दोन डबेवालेही सहभागी होणार आहे. राजा चार्ल्स यांना भेट म्हणून पुणेरी पगडी आणि शाल मुंबईचे डबेवाले देणार आहेत. 






एलिझाबेथ II ने ब्रिटनची राणी म्हणून वर्षानुवर्षे राज्य केले. आता  राजा चार्ल्स III यांचा दशकांनंतर होणारा हा  राज्याभिषेक सोहळा विशेष मानला जात आहे. या समारंभात कॅटी पेरी, लिओनेल रिची, अँड्रिया बोसेली, सर ब्रायन टेरफेल, फ्रेया राइडिंग्ज, अॅलेक्सिस फ्रेंच यांच्यासह अनेक सेलिब्रिटी उपस्थित असतील.


2020 मध्ये सोनमचा 'एके वर्सेज एके' हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीस आला होता. आता लवकरच ती ब्लाइंड या चित्रपटामधून प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. या चित्रपटामध्ये सोनमसोबत अभिनेता पूरब कोहली आणि विनय पाठक हे देखील प्रमुख भूमिका साकारणार आहेत. सोनमच्या आगामी चित्रपटांची प्रेक्षक उत्सुकतेने वाट बघत आहेत. सोनम सोशल मीडियावर देखील अॅक्टिव्ह असते. वेगवेगळे लूकमधील फोटो सोनम सोशल मीडियावर शेअर करते. सोनम तिच्या वक्तव्यांमुळे देखील चर्चेत असते.






वाचा इतर महत्वाच्या बातम्या: 


Sonam Kapoor On Mumbai Traffic: 'मुंबईमध्ये गाडी चालवणे त्रासदायक'; सोनमचं ट्वीट, नेटकऱ्यांनी केलं ट्रोल, म्हणाले, 'पापा की परी...'