sonam kapoor : बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेत्री सोनम कपूर (sonam kapoor) सोशल मीडियावर नेहमी अॅक्टिव्ह असते. सोनम वेगवेगळ्या विषयांवरील तिची मतं सोशल मीडियावर शेअर करते. भाजपा आमदार सुधीर मुनगंटीवार (sudhir mungantiwar) यांनी विधानसभेत एलजीबीटीक्यू समुदायाबद्दल केलेल्या विधानावर नुकतीच सोनमनं संताप व्यक्त केला आहे. तिने इन्स्टाग्रावर स्टोरी शेअर केली.
सोनमची पोस्ट
सोनम कपूरने इन्स्टास्टोरीमध्ये सुधीर मुनगंटीवार यांचा फोटो शेअर करून लिहिले, ‘अडाणी, दुर्लक्ष करावं असं आणि द्वेषपूर्ण’ सोनमची ही पोस्ट सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. तिचे चाहते देखील या विषयी मत व्यक्त करत आहेत.
महाराष्ट्र विधीमंडळात 28 डिसेंबरला विद्यापीठ सुधारणा विधेयक मंजूर झालं. त्यावेळी विद्यापीठ सुधारणा विधेयकावरून सत्ताधारी आणि विरोधक आमने-सामने आले होते. सभागृहात 'महाराष्ट्र पब्लिक युनिवर्सिटी अॅक्ट 2016' विधेयकावर चर्चा सुरु असतानाच भाजपच्या सुधीर मुनगंटीवार यांनी विरोध दर्शवत टिका केली. LGBTQIA समुदायातील सदस्यांना सहभागी करुन घेण्याला विरोध दर्शवताना सुधीर मुनगंटीवार यांनी आक्षेपार्ह वक्तव्य केली. समलैंगिक संबंध ठेवणाऱ्यांना तुम्ही सदस्य नियुक्त करता,हे विधेयक आहे तुम्हाला याबाबत काही काही गांभीर्य आहे का? अजुन अनैसर्गिक संबंधांची परिभाषाही नाही, कोण सिद्ध करणार हे, काय कायदे करतोय आपण' असं मुनगंटीवार म्हणाले.
संबंधित बातम्या
Arbaaz Khan-Malaika Arora Divorce : मलायकासोबत घटस्फोटानंतर ट्रोल झाला होता अरबाज; दिले सडेतोड उत्तर
Rubina Dilaik : ...म्हणून चाहत्यावर भडकली रुबिना दिलैक; शेअर केली पोस्ट
LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha