Neha Kakkar Viral Video : प्रसिद्ध गायिका नेहा कक्कर (Neha Kakkar) हिने बॉलिवूडमध्ये स्वत:ची वेगळी ओळख निर्माण केली आहे. नेहाचे देश-विदेशात असंख्य चाहते आहेत. तिच्या कॉन्सर्टमध्येही मोठी गर्दी पाहायला मिळते. नेहा कक्कर कायम चर्चेत असते, याशिवाय तिचे अनेक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. सध्या नेहा कक्करचा एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. प्रसिद्ध गायिका नेहा कक्करने एका अमेरिकन गायकाला किस केल्याचं बोललं जात आहे. एक व्हिडीओ व्हायरल होत असून यामुळे वेगवेगळ्या चर्चांना उधाण आलं आहे. 


नेहा कक्करने अमेरिकन गायकाचं चुंबन घेतलं?


सध्या सोशल मीडियावर एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. व्हायरल व्हिडीओमध्ये एक तरुणी एका अमेरिकन सिंगरला किस करताना दिसत आहे. हा व्हिडीओ नेहा कक्करचा असल्याचं बोललं जात आहे. नेहा कक्करने एका अमेकिरन गायकाला किस केल्याचा दावा या व्हायरल व्हिडीओतून करण्यात येत आहे. हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत असून यावर नेटकऱ्यांच्या कमेंट्सही व्हायरल होत आहे. 






व्हायरल व्हिडीओमध्ये अमेरिकन गायकाचं चुंबन घेणारी तरुणी गायिका नेहा कक्करप्रमाणे दिसत असल्याचं अनेकांचं म्हणणं आहे. यामुळे नेहा कक्करने अमेरिकन गायकाला किस केल्याच्या पोस्टचा सोशल मीडियावर पाऊस पडला आहे. या व्हिडीओमागचं सत्य काय आहे, हे शोधण्याचा आम्ही प्रयत्न केला आहे. 


व्हायरल व्हिडीओमागचं सत्य काय?


व्हायरल व्हिडीओ सर्च इमेजद्वारे गुगलवर शोधल्यावर एक जुना व्हिडीओ समोर आली. ही बातमी डेली मेलने 18 सप्टेंबर 2022 ला हाच व्हिडीओ पहिल्यांदा समोर आणला होता. डेली मेलच्या बातमीनुसार, स्पॅनिश गायक आणि गीतकार एनरिक इग्लेसियस याने एका चाहतीला किस करत सर्वांना आश्चर्यचकित केलं होतं.


2022 मधील व्हिडीओ पुन्हा व्हायरल


लास वेगासमध्ये एका कार्यक्रमादरम्यान ही घटना घडली होती. गायक एनरिकनेही 18 सप्टेंबर 2022 रोजी त्याच्या अधिकृत एक्स मिडिया हँडलवरही तोच व्हिडीओ पोस्ट केला होत आणि कॅप्शनमध्ये लिहिलं होतं की, ''शुक्रवारची रात्र #LASVEGAS मध्ये @resortsworldlv मध्ये आज रात्री भेटू !!!!''






हा व्हिडीओ नेमका कुणाचा?


आता पुन्हा एकदा स्पॅनिश गायकाचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या व्हिडीओमध्ये किस करताना दिसणाऱ्या मुलीच्या चेहऱ्याची अनेकांनी नेहा कक्करच्या चेहऱ्याची तुलना केली आहे. मात्र, हा व्हिडीओ नेहा कक्करचा नसल्याचं समोर आलं आहे. शिवाय हा व्हिडीओ आताचा नसून जुना असल्याचं समोर आलं आहे.






महत्त्वाच्या इतर बातम्या :


गलिच्छ! या निर्लज्जपणाला तुम्ही करमणूक समजताय? दोन बायकांसोबत बिग बॉसमध्ये एन्ट्री करणाऱ्या यु्ट्यूबरवर देबोलिना भडकली