Adil Khan And Somi Khan : काही दिवसांपूर्वीच राखी सावंतचा (Rakhi Sawant) Ex Husband आदिल खान (Aadil Khan) याने सोमी खानसोबत (Somi Khan) लग्न केलं. त्यांच्या या लग्नाची बरीच चर्चा होती. आदिलने सोमीसोबत 3 मार्च रोजी लग्न केलं. पण त्यांनी त्यांच्या लग्नाविषयी लगचेच कोणत्याही प्रकारची चर्चा होऊ दिली नाही. त्यामुळे त्यांच्या नात्याविषयी अनेक गोष्टी बोलल्या जाऊ लागला. अखेर आदिलने त्याच्या सोशल मीडिया अकाऊंटवरुन याबाबत माहिती दिली. 


पण आता आदिलसोबतच्या नात्यावर सोमी खान हिनं मौन सोडलं आहे. तसेच तिने आदिल खान आणि राखी सावंत यांच्या नात्याविषयी देखील भाष्य केलं आहे. नुकतच राखीने देखील यावर प्रतिक्रिया देत त्यांच्या लग्नाविषयी भाष्य केलं. आता सोमीने देखील त्यांच्या नात्याविषयी प्रतिक्रिया दिली आहे. 


काय म्हणाली सोमी खान?


राखी सावंतपासून विभक्त झाल्यानंतर आदिलने सोमीसोबत लग्नगाठ बांधली. त्यांच्या या नात्यावर बोलताना सोमी खान हीनं म्हटलं की, आमचं 3 मार्च रोजी लग्न झालं. एका शुटींगदरम्यान आम्ही भेटलो होतो, पण पुन्हा एकदा एका अॅवॉर्ड शोमध्ये आमची भेट झाली. जवळपास गेले सात महिने आम्ही एकमेकांना ओळखत आहोत. सुरुवातीला आमची मैत्री झाली त्यानंतर त्याचं प्रेमात रुपांतर झालं. त्यानंतर आम्ही लग्न करण्याचा निर्णय घेतला. 


आम्हाला आमचं लग्न खासगी ठेवायचं होतं - सोमी खान


आदिल आणि सोमी यांनी गुपचूप लग्न उरकलं असल्याच्या चर्चा होत्या. त्यावर बोलताना सोमीने म्हटलं की, आम्ही गुपचूप लग्न केलं नाहीये, फक्त आम्हाला आमचं लग्न खासगी ठेवायचं होतं. आम्हाला कोणत्याही प्रकारची नकारात्मकता, वाद किंवा पब्लिसिटी स्टंट नको होता. आमचं हे नातं आम्हाला फक्त आमच्या कुटुंबापुरतं ठेवायचं होतं. त्यामुळे आमच्या घरच्यांनी आमच्या लग्नाचा दिवस ठरवला आणि त्या दिवशी आमचं लग्न झालं. 


आदिल माझं भविष्य - सोमी खान


मागील काही दिवसांपासून आदिल खान आणि राखीच्या नात्याविषयी बरीच चर्चा झाली. त्यावर बोलताना सोमी म्हणाली की, आता आम्ही एकत्र एका नव्या प्रवासाला सुरुवात केली आहे, मला माहित आहे की आदिलने खूप काही सहन केलंय. त्यामुळे आता आम्हाला मागे वळून नाही बघायचं. आता मी फक्त आदिलसोबत माझं भविष्य पाहतेय, त्याचा भूतकाळ नाही. 




ही बातमी वाचा : 


Aishwarya Sharma and Neil Bhatt : 'असाच नवरा हवा गं बाई', भर कार्यक्रमात सांभाळला बायकोचा ड्रेस,एश्वर्या शर्मा आणि नील भट्टच्या प्रेमाची पुन्हा एकदा चर्चा