Ranveer Singh Deepika Padukone At Airport : बॉलिवूड अभिनेत्री दीपिका पादुकोण (Deepika Padukone) आणि रणवीर सिंह (Ranveer Singh) सध्या चांगलेच चर्चेत आहेत. काही दिवसांपूर्वी सोशल मीडियावर खास पोस्ट शेअर करत त्यांनी चाहत्यांना गुडन्यूज दिली. दीपवीर आई-बाबा होणार असल्याने चाहतेदेखील आनंदी आहेत. अशातच रणवीर-दीपिकाचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. हा व्हिडीओ त्यांच्या चाहत्यांच्या पसंतीस उतरला असून ते रणवीरचं कौतुक करत आहेत. 


दीपिका आणि रणवीर सध्या त्यांच्या सिनेमांपेक्षा वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत आहेत. दीपिकाचे अनेक फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. काही दिवसांपूर्वी अनंत अंबानी (Anant Ambani) आणि राधिका मर्चेंट (Radhika Merchant) यांच्या प्री-वेडिंग कार्यक्रमात मजा-मस्ती करताना ते दिसून आले होते. अशातच आता त्यांचा एक नवा व्हिडीओ सध्या व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये जोडपं एअरपोर्टवर दिसून येत आहे.


दीपिकासोबत रणवीर एअरपोर्टवर स्पॉट


दीपिपा पादुकोणचा एअरपोर्टवरील एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये दीपिका पती रणवीरसोबत एअरपोर्टवर दिसून येत आहे. 
रणवीर आणि दीपिका एकाच कारमध्ये बसलेले दिसत आहेत. रणवीर आपली पत्नी दीपिकाला एअरपोर्टवर सोडायला गेला होता. व्हिडीओमध्ये रणवीर-दीपिकाचा कूल अंदाज पाहायला मिळत आहे. 


रणवीर-दीपिकाचा व्हिडीओ पाहा (Ranveer Singh Deepika Padukone Video) : 






रणवीर-दीपिकाच्या व्हिडीओवर चाहत्यांचा कमेंट्सचा वर्षाव


रणवीर-दीपिकाच्या व्हायरल व्हिडीओवर नेटकऱ्यांनी कमेंट्सचा वर्षाव केला आहे. त्यांचा क्यूट व्हिडीओ नेटकऱ्यांच्या पसंतीस उतरला आहे. दोघेही खूप गोड आहेत, पती असावा तर असा, एक नंबर जोडी, बाळाची प्रतीक्षा, एकमेकांची काळजी घ्या, अशा कमेंट्स चाहत्यांनी केल्या आहेत.


बॉलिवूडमधील पॉवर कपलमध्ये दीपिका पादुकोण आणि रणवीर सिंहचा समावेश आहे. रामलीलाच्या सेटवर ते एकमेकांच्या प्रेमात पडले. 2012 मध्ये त्यांनी डेटिंगला सुरुवात केली. तर 2018 मध्ये इटलीत त्यांचा शाही विवाहसोहळा पार पडला. आता रणवीर-दीपिकाच्या बाळाची चाहते आतुरतेने वाट पाहत आहेत. दीपिकाचा 'फायटर' (Fighter) हा सिनेमा काही दिवसांपूर्वी रिलीज झाला होता. तर दुसरीकडे रणवीरचा 'डॉन' (Don) हा सिनेमा लवकरच प्रदर्शित होणार आहे.


संबंधित बातम्या


Deepika Padukone Dance : अनंत-राधिकाच्या प्री-वेडिंगमध्ये प्रेग्नंट दीपिका पादुकोणचा धमाकेदार डान्स; शाहरुखने दिल्या 'जय श्रीराम'च्या घोषणा