Aishwarya Sharma and Neil Bhatt : बिग बॉस सीजन 17 (Bigg Boss Season 17) मधून ऐश्वर्या शर्मा (Aishwarya Sharma) आणि नील भट्ट (Neil Bhatt) हे सेलिब्रिटी कपल चर्चेत आलं होतं. बिग बॉसच्या घरातही या कपलची बरीच चर्चा झाली होती. पण आता पुन्हा एकदा हे कपल सोशल मीडियावर चर्चेत आलंय. एका कार्यक्रमात नील पत्नी ऐश्वर्याचा ड्रेस सांभाळताना दिसला. ऐश्वर्या आणि नीलचा हा व्हिडिओ सध्या बराच पसंतीस पडत आहे. 


बिग बॉसच्या घरात ऐश्वर्या आणि नील यांच्या प्रेमाची बरीच चर्चा झाली होती. त्यामुळे त्यांच्याकडे एक आदर्श जोडपं म्हणून सगळेजण पाहू लागले. तिथेही नील ऐश्वर्याची बरीच काळजी घेताना दिसला होता. त्यामुळे तो एक परफेक्ट नवरा असल्याचं सगळेजण म्हणू लागले. पुन्हा एकदा नील त्याच्या परफेक्ट हसबंडला खरा उतरला आहे. यामुळे त्याचे चाहते देखील पुन्हा एकदा इंप्रेस झाल्याचं पाहायला मिळत आहे. 


नेमकं काय घडलं?


खरंतर जिओ वर्ल्ड कन्वेंशन सेंटर येथे आयोजित करण्यात आलेल्या मिस वर्ल्ड या कार्यक्रमासाठी नील आणि ऐश्वर्या यांनी हजेरी लावली होती. या सोहळ्यासाठी ऐश्वर्याने एक सुंदर ब्लॅक कलरचा लॉन्ग वन पिस घातला होता. तिच्या या ड्रेसला लॉन्ग टेलसुद्धा अटॅज्ड होतं. जेव्हा ऐश्वर्या फोटोसाठी उभी राहत होती, तेव्हा तिचा ड्रेस तिच्या पायात येत होता. अशावेळी नीलने त्याच्या बायकोचा ड्रेस सांभाळला. 


सोशल मीडियावर पुन्हा एकदा चर्चा


कॅमेऱ्यांसमोर नील ऐश्वर्याचा ड्रेस पकडून चालत असल्याचं कैद झालं. तसेच नीलने ऐश्वर्याचा ड्रेसही बऱ्याच वेळा ठिक केल्याचं पाहायला मिळालं. यामुळे ऐश्वर्याला फोटो काढण्यासाठी नीट पोज देता आली. नीलचं त्याच्या बायकोसाठी असलेलं हे प्रेम पाहून त्याच्या चाहत्यांमध्ये पुन्हा एकदा या परफेक्ट कपलच्या चर्चा होऊ लागल्या. सोशल मीडियावर अनेकांनी या व्हिडिओवर कमेंट्स केल्या आहेत.  एका युजरसने कमेंट करत म्हटल की, नवरा असावा तर नील सारखा, तर दुसऱ्या एका युजरने या दोघांनाही परफेक्ट कपलची उपमा दिली आहे. 






ही बातमी वाचा : 


Marathi Serial : रावडी सत्या आणि भित्री कॉन्स्टेबल मंजूची नवी मालिका लवकरच येणार प्रेक्षकांच्या भेटीला; प्रोमो आऊट!