Seema Sajdeh Dating Life : बॉलिवूड सुपरस्टार सलमान खानला येणाऱ्या धमक्यांमुळे त्याच्यासह त्याचं कुटुंब चर्चेत आलं आहे. सलमानचा भाऊ अभिनेता सोहेल खान याची एक्स-वाइफ सीमा सजदेह यांचा दोन वर्षांपूर्वी घटस्फोट झाला. सीमा सजदेहने पळून जाऊन सोहेल खानसोबत लग्न केलं होतं. 1998 मध्ये सोहेल आणि सीमा यांनी लग्न केलं, त्यानंतर 2022 मध्ये लग्नाच्या 24 वर्षांनंतर दोघं विभक्त झाले. या दोघांना दोन मुले आहेत. घटस्फोट झाल्यानंतर दोघेही स्वत:चं वैयक्तिक आयुष्य वेगळेपणाने जगत आहेत. अशात आता सीमा सजदेहच्या पर्सनल लाइफ चर्चेत आली आहे.
सोहेल खानसाठी ज्याच्यासोबत तोडलं नातं
सोहेल खानची पूर्वाश्रमीची पत्नी सीमा सजदेह नुकतीच नेटफ्लिक्सवरील 'द ग्रे इंडियन कपिल शर्मा शो'मध्ये दिसली होती. यासोबतच ती ओटीटी प्लॅटफॉर्मवरील प्रसिद्ध रिॲलिटी शो 'Fabulous Lives of Bollywood Wives' मध्ये देखील दिसणार आहे. तिने शोमध्ये खुलासा केला आहे की, तिच्या आयुष्यात पुन्हा एकदा प्रेमाची एन्ट्री झाली आहे. सीमा सजदेहने तिच्या नवीन प्रेमाबद्दल पहिल्यांदाच व्यक्त केली आहे.
'या' व्यक्तीला डेट करतेय Ex वाइफ सीमा सजदेह
'फेब्युलस लाईव्हज ऑफ बॉलीवूड वाइव्हज' सीझनच्या शेवटच्या एपिसोडमध्ये सीमा सजदेहने सांगितलं की, सोहेल खानपासून घटस्फोट घेतल्यानंतर ती आयुष्यात मुव्ह ऑन झाली आहे. सीमाने सांगितलं की, ती विक्रम आहुजाला डेट करत आहे. सर्वात महत्त्वाची बाब म्हणजे हा तोच विक्रम आहुजा आहे, ज्याच्यासोबत सीमाने तिचा साखरपुडा मोडला होता आणि सोहेलसोबत पळून जाऊन लग्न केलं होतं.
महत्त्वाच्या इतर बातम्या :