एक्स्प्लोर
गायिका नेहा कक्कर आणि अभिनेता हिमांश कोहली रिलेशनशिपमध्ये?
न्यू ईयर पार्टीपासून व्हॅलेंटाईन्स डे, आऊटिंग यासारख्या अनेक इव्हेंटचे फोटो त्यांनी सोशल मीडियावर शेअर केले आहेत.
![गायिका नेहा कक्कर आणि अभिनेता हिमांश कोहली रिलेशनशिपमध्ये? Singer Neha Kakkar dating with bollywood actor Himansh Kohli गायिका नेहा कक्कर आणि अभिनेता हिमांश कोहली रिलेशनशिपमध्ये?](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/4/2018/03/12133203/Neha_Kakkar.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
मुंबई : अभिनेता आणि अभिनेत्री एकमेकांना डेट करणं आता कोणासाठीही आश्चर्याची बाब राहिलेली नाही. पण ही नवी जोडी बॉलिवूड आणि संगीत क्षेत्रामधील परफेक्ट मिक्स आहे. गायिका नेहा कक्कर आणि अभिनेता हिमांश कोहली ही बॉलिवूडमधली नवी जोडी आहे.
काला चश्मा, लडकी ब्यूटीफुल कर गई चुल यांसारखी अनेक हिट गाणी गाणारी गायिका नेहा कक्कर सध्या 'यारियां' फेम अभिनेता हिमांश कोहलीसोबत वेळ घालवताना दिसत आहे. दोघे आपापल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर एकमेकांचे फोटो शेअर करत आहेत. इतकंच नाही तर ते एकमेकांना 'बेस्टी' म्हणून सांगत आहेत.
न्यू ईयर पार्टीपासून व्हॅलेंटाईन्स डे, आऊटिंग यासारख्या अनेक इव्हेंटचे फोटो त्यांनी सोशल मीडियावर शेअर केले आहेत. तसंच टेडी डेला नेहा कक्करने एका मोठ्या टेडीसोबत फोटो पोस्ट करुन त्यात हिमांश कोहलीलाही टॅग केलं होतं.
हिमांश आणि नेहा कक्करची भेट एका म्युझिक व्हिडीओच्या चित्रीकरणादरम्यान झाली होती. नेहाने हिमांशचा पदार्पणाचा चित्रपट 'यारियां'साठी हनी सिंहसोबत आज 'ब्लू है पानी पानी' हे गाणंही गायलं आहे.
![गायिका नेहा कक्कर आणि अभिनेता हिमांश कोहली रिलेशनशिपमध्ये?](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/4/2018/03/12132350/Neha_Himansh.jpg)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
भारत
राजकारण
राजकारण
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)