Ankita Lokhande : रणदीप हुड्डा (Randeep Hooda) दिग्दर्शित 'स्वातंत्र्यवीर सावरकर' हा चित्रपट आजच म्हणजे 22 मार्च रोजी प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. मागील काही दिवसांपासून या चित्रपटाची जोरदार चर्चा सुरु होती. या चित्रपटात रणदीप हुड्डा यानेच स्वातंत्र्यवीर सावरकर (swatantra veer savarkar) यांची भूमिका साकारली आहे. तसेच अंकिता लोखंडेने (Ankita Lokhande) सावरकरांच्या पत्नीची भूमिका साकारलीये. पण सध्या अंकिता एका वेगळ्या गोष्टीमुळे चर्चेत आलीये. सध्या अंकिताचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झालाय. 


स्वातंत्र्यवीर सावरकर या चित्रपटाच्या प्रिमयमदरम्यान अंकिता लोखंडे पापाराझींवर भडकल्याचं पाहायला मिळालं. तिचा हा व्हिडिओ सोशल मीडियावरही चांगलाच चर्चेत आलाय. गुरुवारी संध्याकाळी या चित्रपटाचं स्पेशल स्क्रिनिंग करण्यात आलं होतं. या स्क्रिनिंगसाठी अंकिताने बिग बॉसमधील काही कलाकारांनाही बोलावलं होतं. तेव्हाच नेमकं हे तिघे पापाराझींच्या कॅमेऱ्यामध्ये आले आणि अंकिता त्यांच्यावर भडकली. 


नेमकं काय घडलं?


सावरकर या चित्रपटाच्या स्क्रिनिंगला बिग बॉस फेम  अभिषेक कुमार आणि फिरोजा (खानजादी) यांनी देखील हजेरी लावली. त्याचवेळी पापाराझी त्यांच्या मागे कॅमेरे घेऊन गेले. त्यातील काही जण चला चला आपण आत जाऊ असं म्हटलं, तेव्हा अंकिता त्या पापाराझींवर भडकली. त्यांना अंकिताने अडवलं. 'तुम्ही बाहेर निघा, आत चित्रपट सुरू आहे आणि तुम्ही असे आत येताय, हे तुम्ही खूप चुकीचं करताय; थोडं तरी भान राखा.'






सावरकर चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला


'स्वातंत्र्यवीर सावरकर'ची घोषणा झाल्यापासून हा सिनेमा प्रोपगंडा असल्याचं म्हटलं जात होतं. त्यातच आज म्हणजेच 22 मार्च रोजी हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. या चित्रपटासाठी रणदीप हुड्डाने जवळपास 30 किलो वजन कमी केल्याचं माझा कट्टावर सांगितलं होतं. त्यानंतर त्याचा एक फोटो देखील बराच चर्चेत आला होता.  त्यामुळे बॉक्स ऑफिसवर या चित्रपटाची घोडदौड कशी सुरु राहणार याची उत्सुकता सर्वांना लागून राहिली आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन रणदीप हुड्डानेच केले आहे. 


ही बातमी वाचा : 


Ananya Panday-Aditya Roy Kapur : डोहाळजेवणाचा कार्यक्रम अनन्याच्या बहिणीचा, पण सर्वांच्या नजरा आदित्य रॉय कपूरच्या हजेरीवर, सोशल मीडियावर चर्चांना उधाण