Sidhu Moose Wala : सिनेसृष्टीत आपला दबदबा निर्माण करणं हे प्रत्येक कलाकाराचं स्वप्न असतं. हे स्वप्न साकार करण्यासाठी खूप मेहनत घ्यावी लागते. पण दिवंगत पंजाबी गायक सिद्धू मुसेवाला (Sidhu Moose Wala) यांनी  मात्र अल्पावधीतच मनोरंजनसृष्टीत स्वत:ची वेगळी ओळख निर्माण केली आहे. आपल्या आवाजाने त्याने सर्वांनाच वेड लावलं आहे. 


सिद्धू मुसेवालाचे खरे नाव शुभदीप सिंह सिद्धू आहे हे फार कमी लोकांना ठाऊक आहे. आज सिद्धू मुसेवाला यांची जयंती आहे. 11 जून 1993 रोजी मानसाच्या मुसा गावात भोला सिंह आणि चरण कौर यांच्या घरी सिद्धू मुसेवाला यांचा जन्म झाला. सिद्धू मुसेवाला यांना लहानपणापासूनच गाण्याची आवड होती. मोठं झाल्यावर संगीतक्षेत्रात काम करायचं हे त्यांनी बालपणीच ठरवलं होतं. 


मृत्यनंतरही गाण्याच्या माध्यमातून चाहत्यांच्या मनात जिवंत असलेला गायक


सिद्धू मुसेवाला यांनी गीतलेखनापासून त्यांच्या संगीतक्षेत्रातील करिअरची सुरुवात केली. गायनापासून सुरू झालेला त्यांचा प्रवास त्यांना पुढे राजकारणापर्यंत घेऊन गेला. आपल्या गायकीच्या जोरावर सिद्धू मुसेवाला यांनी वयाच्या अवघ्या 29 व्या वर्षी तरुणाईला वेड लावले होते. आता मृत्यूनंतरही ते त्यांच्या गाण्यांच्या माध्यमातून चाहत्यांच्या मनात जिवंत आहेत. त्यांची गाणी आजही अनेक पार्ट्यांमध्ये किंवा लग्नसोहळ्यांत वाजवली जातात.  


सिद्धू मुसेवाला यांचं शालेय शिक्षण गावातील सरकारी शाळेत झालं आहे. त्यानंतर त्यांनी गुरू नानक देव अभियांत्रिकी महाविद्यालय लुधियाना येथून इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग केले. गायनात यशस्वी झाल्यानंतर सिद्धू यांनी राजकारणात येण्याचा विचार केला आणि 2022 च्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेस पक्षात प्रवेश केला. पण गायनाप्रमाणे राजकारणात त्यांना यशस्वी होता आलं नाही. 
सिद्धू मुसेवाला यांनी आपल्या आवाजाने सर्वांचं लक्ष वेधून घेतलं. 30 मे 2022 रोजी सिद्धू मुसेवाला यांची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली. आज ते जिवंत नसले तरी त्यांच्या गाण्यांनी त्यांना आजही अजरामर केले आहे. 


रातोरात झाले स्टार


सिद्धू मुसेवाला यांनी  गीतकार म्हणून संगीतक्षेत्रात पदार्पण केलं आहे. 'लायसेन्स' असे त्याच्या पहिल्या गाण्याचे नाव होते. हे गाणं पंजाबी गायक निंजा यांनी गायले आहे. 'सो हाई' या गाण्याने सिद्धू मुसेवाला यांना लोकप्रियता मिळाली. या गाण्यामुळे सिद्धू मुसेवाला यांचे नाव जगभरात ओळखले जाऊ लागले. अशाप्रकारे सिद्धू रातोरात स्टार झाले. सिद्धू मुसेवाला यांच्या  'सो हाई' या गाण्याला यूट्यूबवर 477 मिलिअन व्हूयूज मिळाले आहेत. 


संबंधित बातम्या


Sidhu Moose Wala: सिद्धू मूसेवाला यांची पहिली पुण्यतिथी; मृत्यनंतरही गाण्याच्या माध्यमातून चाहत्यांच्या मनात जिवंत असलेला गायक