Teri Meri Dastaan : सिद्धार्थ आणि पल्लवीचा रोमॅंटिक अंदाज; ‘तेरी मेरी दास्तान’ येणार प्रेक्षकांच्या भेटीला

Teri Meri Dastaan : सिद्धार्थ मेनन आणि पल्लवी पाटीलची जोडी ‘तेरी मेरी दास्तान’च्या माध्यमातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

Continues below advertisement

Teri Meri Dastaan : 'प्रेम’ या अडीच अक्षरी शब्दांत दडलेली भावना लाखमोलाची असते. प्रत्येकाच्या प्रेमाची एक वेगळीच कहाणी असते. राष्ट्रीय पारितोषिकविजेता अभिनेता सिद्धार्थ मेनन (Siddharth Menon) आणि अभिनेत्री पल्लवी पाटील (Pallavi Patil) यांच्या प्रेमाची रोमँटिक दास्तान लव्हेबल अंदाजात लवकरच आपल्याला पहायला मिळणारआहे. 

Continues below advertisement

‘तेरी मेरी दास्तान’ या हिंदी गाण्याच्याअल्बम मधून सिद्धार्थ आणि पल्लवी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहेत. या म्युझिक अल्बमच्यामाध्यमातून व्हिडीओ पॅलेस हिंदी अल्बम निर्मीती क्षेत्रात पदार्पण करीत आहेत.

‘तेरी मेरी दास्तान’ अल्बम मधील गाणं काश्मीरमधील हटकेलोकेशनवर चित्रीत केलं आहे. या गाण्याचे दिग्दर्शन फुलवा खामकरने केले आहे. तर काश्मीरचे नेत्रसुखद सौंदर्य दाखवण्याचे काम राष्ट्रीय पारितोषिक विजेते छायालेखक अमोल गोळे यांनी केले आहे. अब्दुल शेख याने गायलेल्या या गाण्याला विदुर आनंदयांचे संगीत लाभले आहे.

या गाण्यात सिद्धार्थचा शांत तर पल्लवीचा काहीशा चुलबुला अंदाज पहायला मिळणार आहे. प्रत्येक प्रेमकथेतअसणारा ‘प्रेम’ हा समान धागा सोडला तर प्रत्येकाच्याच प्रेमाची एक निराळीगोष्ट असते अशीच प्रेमात पाडणारी ‘लव्हेबल’ गोष्ट या अल्बम मधून उलगडणार आहे.

'तेरी मेरी दास्तान'च्या शूटिंग अनुभवाबद्दलबोलताना सिद्धार्थ आणि पल्लवी म्हणाले की, तीन डिग्री तापमानात आम्ही हे शूट पूर्ण केलं असून ते आम्ही खूप एन्जॉय केलं. गाण्याची ही रोमँटिक सफर प्रेक्षकसुद्धा एन्जॉय करतील असा विश्वास आहे.

संबंधित बातम्या

Timepass 3 : 'टाइमपास 3'ची कमाल; चार दिवसांत कमवला 4.36 कोटींचा गल्ला

OTT This Week : 'डार्लिंग्स' ते 'लाइटईयर'; या आठवड्यात ओटीटीवर 'हे' धमाकेदार सिनेमे आणि सीरिज होणार रिलीज

Continues below advertisement
Sponsored Links by Taboola