रेखा, जयाच नाहीतर, 'ही' सौंदर्यवतीही होती अमिताभ बच्चन यांची चाहती; एकतर्फी प्रेमात रात्र-रात्रभर रडायची अभिनेत्री
Parveen Babi Love Amitabh Bachchan: अमिताभ बच्चन, रेखा यांच्या अफेअरच्या चर्चा संपूर्ण जगाला माहितीयत, पण आणखी एक सौंदर्यवती होती, जी अमिताभ यांच्यासाठी वेडी होती आणि त्यांच्यासाठी खूप अश्रू ढाळायची.
Continues below advertisement
Parveen Babi Love Amitabh Bachchan
Continues below advertisement
1/8
अमिताभ बच्चन हे असे बॉलिवूड अभिनेते आहेत, ज्यांच्यासाठी प्रत्येकजण आपला प्राण अर्पण करू शकत होता. या अभिनेत्याचे जगभरात प्रचंड चाहते आहेत, पण चित्रपटसृष्टीत अशा अनेक अभिनेत्री आहेत, ज्यांचा अमिताभ बच्चन यांच्यावर जीव जडला होता.
2/8
बॉलिवूड कॉरिडॉरमध्ये अमिताभ आणि रेखा यांच्या प्रेमसंबंधांबद्दल बरीच चर्चा झाली. बिग बींनी यावर कधीही प्रतिक्रिया दिली नसली तरी, रेखा यांनी नेहमीच सुपरस्टारबद्दलच्या भावना व्यक्त केल्यात.
3/8
पण त्या वेळी बॉलिवूडमध्ये आणखी एक सौंदर्यवती होती, जिचं नाव परवीन बाबी होतं. परवीन बाबीचा अमिताभ बच्चन यांच्यावर जीव जडला होता.
4/8
अभिनेत्रीनं खूप प्रयत्न केले, शपथ घेतली आणि रात्रभर अश्रू ढाळले पण तिला बिग बींचं प्रेम मिळालं नाही.
5/8
त्या काळात अभिनेत्री अनेक वैद्यकीय समस्या आणि एका गंभीर आजारातून जात होती. हा तो काळ होता, जेव्हा परवीन बाबी अमिताभ बच्चन यांच्यासाठी मोठमोठ्यानं रडायला सुरुवात करायची.
Continues below advertisement
6/8
सर्वांना अभिनेत्रीच्या समस्येची जाणीव होती. या सगळ्यामध्ये, दिग्दर्शक महेश भट्ट यांनी अमिताभ यांची भेट घेऊन त्यांना अभिनेत्रीशी चांगलं वागण्यास आणि तिची काळजी घेण्यास सांगितलेलं.
7/8
त्याच वेळी, परवीन आणि महेश भट्ट एकमेकांना डेट करत असल्याच्या बातम्याही समोर आल्या होत्या. दोघांची नावं एकमेकांशी जोडली जात होती आणि इंडस्ट्रीत त्यांच्या अफेअरबद्दल बरीच चर्चा होत होती. याव्यतिरिक्त अभिनेत्रीचं नाव डॅनी डेन्झोंगपा आणि कबीर बेदी यांच्याशीही जोडलं गेलेलं.
8/8
परवीन बाबीनं तिच्या कारकिर्दीतील सर्वोत्तम चित्रपट दिलेत. पण अभिनेत्रीच्या आजारानं तिचं सर्वस्व उद्ध्वस्त केलं. 2005 मध्ये, आजारामुळेच परवीन बाबींचा जीव घेतला.
Published at : 29 May 2025 02:29 PM (IST)