OTT Release This Week : कोरोनाकाळानंतर प्रेक्षक ओटीटी (OTT) माध्यमाकडे वळू लागले आहेत. ओटीटीवर प्रत्येक आठवड्यात अनेक सिनेमे आणि वेबसीरिज प्रदर्शित होत असतात. या आठवड्यातदेखील 'डार्लिंग्स', 'लाइटईयर', 'कडुवा'सारखे अनेक सिनेमे आणि वेबसीरिज प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.


लाइटईयर
कधी होणार प्रदर्शित? 3 ऑगस्ट
कुठे होणार प्रदर्शित? डिज्नी प्लस हॉटस्टार


'लाइटईयर' हा सिनेमा 17 जूनला सिनेमागृहात प्रदर्शित झाला होता. आता हा सिनेमा डिज्नी प्लस हॉटस्टार या ओटीटी प्लॅटफॉर्मवर रिलीज होणार आहे. या सिनेमात प्रेक्षकांना अॅक्शनचा तडका अनुभवायला मिळणार आहे. 'लाइटईयर' हा एक वेगळ्या धाटणीचा सिनेमा आहे. 


कडुवा
कधी होणार प्रदर्शित? 4 ऑगस्ट
कुठे होणार प्रदर्शित? अॅमेझॉन प्राइम व्हिडीओ


दाक्षिणात्य अभिनेता सुकुमारनचा 'कडुवा' हा सिनेमा 7 जुलैला सिनेमागृहात प्रदर्शित झाला होता. हा सिनेमा प्रेक्षकांच्या पसंतीस उतरला होता. आता हा सिनेमा ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित होणार आहे. शाजी कैलासने या सिनेमाच्या दिग्दर्शनाच्या धुरा सांभाळली आहे. या सिनेमात प्रेक्षकांना अॅक्शनचा तडका पाहायला मिळणार आहे. 


वेडिंग सीझन
कधी होणार प्रदर्शित? 4 ऑगस्ट
कुठे होणार प्रदर्शित? नेटफ्लिक्स


'वेडिंग सीझन' ही वेबसीरिज नेटफ्लिक्सवर रिलीज होणार आहे. या सीरिजमध्ये जुने कथानक नव्याने सादर करण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. या सीरिजमध्ये सूरज शर्मा आणि पल्लवी शारदा मुख्य भूमिकेत आहेत. 


द ग्रेट वेडिंग ऑफ मुन्नेस
कधी होणार प्रदर्शित ? 4 ऑगस्ट
कुठे होणार प्रदर्शित? वूट


'द ग्रेट वेडिंग ऑफ मुन्नेस' ही विनोदी वेबसीरिज आहे. या सीरिजमध्ये अभिषेक बनर्जीसह बरखा सिंह, सुनीता रजवार, चेतन शर्मा, सुनील चिटकारा सारख्या अनेक कलाकारांचा समावेश आहे. अभिषेक बनर्जीच्या आयुष्यावर भाष्य करणारी ही सीरिज आहे. या सीरिजमध्ये प्रेक्षकांना नाट्य अनुभवायला मिळणार आहे. 


डार्लिंग्स
कधी होणार प्रदर्शित? 5 ऑगस्ट
कुठे होणार प्रदर्शित? नेटफ्लिक्स


बॉलिवूड अभिनेत्री आलिया भट्टचा 'डार्लिंग्स' हा सिनेमा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. थरार, नाट्य असणारा हा सिनेमा नेटफ्लिक्स या ओटीटी प्लॅटफॉर्मवर रिलीज होणार आहे. या सिनेमात आलियासह विजय शर्मा, शेफाली शाह, रोशन मैथ्यू, विक्रम, इयाना चौधरी मुख्य भूमिकेत आहे. 'डार्लिंग्स' हा रहस्यमय सिनेमा आहे. 


संबंधित बातम्या


Movies : मनोरंजनसृष्टीला ग्रहण; सिनेमागृहांकडे प्रेक्षकांनी फिरवली पाठ


Laal Singh Chaddha : 'मेरी मम्मी कहती थी...'; बहिष्कार घालण्याची मागणी होत असताना 'लाल सिंह चड्ढा'चे नवे पोस्टर आऊट