एक्स्प्लोर

आलियासोबतच्या नात्यावर सिद्धार्थने पहिल्यांदाच मौन सोडलं

'कॉफी विथ करण 6'च्या एपिसोडमध्ये सिद्धार्थ मल्होत्रासोबत आशिकी फेम अभिनेता आदित्य रॉय कपूरला निमंत्रित करण्यात आलं आहे. यावेळी, ब्रेकअपनंतर आलियासोबतच्या नात्याविषयी करणने सिद्धार्थला छेडलं. याला उत्तर देताना दोघांच्या नात्यात कडवटपणा नसल्याचं स्पष्टीकरण सिद्धार्थने दिलं.

मुंबई : अभिनेता सिद्धार्थ मल्होत्रा आणि अभिनेत्री आलिया भट या कोणे एके काळच्या लव्हबर्ड्सच्या ब्रेकअपनंतर चाहते नाराज झाले होते. दोघांनी आपल्या नात्याविषयी कधीच जाहीर वाच्यता केली नव्हती. मात्र 'कॉफी विथ करण 6'च्या एपिसोडमध्ये सिद्धार्थने आपलं मन मोकळं केलं आहे. इतकंच नाही, तर जॅकलीन फर्नांडिस आणि कियारा अडवाणी यांच्यासोबतच्या अफेअरच्या चर्चांवरही उत्तर दिलं आहे. 'कॉफी विथ करण 6'च्या एपिसोडमध्ये सिद्धार्थ मल्होत्रासोबत आशिकी फेम अभिनेता आदित्य रॉय कपूरला निमंत्रित करण्यात आलं आहे. यावेळी, ब्रेकअपनंतर आलियासोबतच्या नात्याविषयी करणने सिद्धार्थला छेडलं. याला उत्तर देताना दोघांच्या नात्यात कडवटपणा नसल्याचं स्पष्टीकरण सिद्धार्थने दिलं. 'काही कारणांमुळे आम्हाला एकमेकांपासून विभक्त होण्याचा निर्णय घ्यावा लागला. आमच्या नात्यात चढउतार आले, त्यामुळे रिलेशनशीपवर परिणाम झाला.' असं सिद्धार्थ म्हणाला. 'डेटिंग सुरु करण्यापूर्वी मी आलियाला ओळखत होतो. स्टुडंट ऑफ दि इयरचा पहिला सीन मी आलियासोबत शूट केला होता. त्यामुळे हे नातं फक्त 'एक्स' म्हणण्यापुरतं नाही. जेव्हा एखादं नातं तुटतं, तेव्हा चांगल्या आणि सुंदर आठवणी लक्षात ठेवायला हव्यात' असंही सिद्धार्थ म्हणाला. जॅकलीन फर्नांडिस आणि कियारा अडवाणी यांच्याशी नाव जोडलं जाण्याबाबतही सिद्धार्थने उत्तर दिलं. जॅकलीनसोबत खास नातं असलं, तरी डेटिंगच्या चर्चांमध्ये काहीच अर्थ नाही, असंही तो म्हणाला. कियारासोबत डेटिंगच्या चर्चा एखाद दिवस खऱ्या ठराव्यात अशी अपेक्षा आहे, असे संकेतही सिद्धार्थने दिले. आलिया आणि अभिनेता रणबीर कपूर सध्या डेट करत आहेत. कपूर कुटुंबाला आलिया सून म्हणून पसंत असल्याचंही म्हटलं जातं.

महत्त्वाच्या बातम्या

Imran Khan Stepfather Raj Zutshi Bollywood Actor: ज्या इमरान खानला देश सोडायला सांगितलंय, त्याचे सावत्र वडील बॉलिवूडचे दिग्गज अभिनेते; 'धुरंधर'मध्ये साकारलीय महत्त्वाची भूमिका, ओळखलं का कोण?
ज्या इमरान खानला देश सोडायला सांगितलंय, त्याचे सावत्र वडील बॉलिवूडचे दिग्गज अभिनेते; 'धुरंधर'मध्ये साकारलीय महत्त्वाची भूमिका
Nana Patekar Son Malhar On Tanushree Dutta Allegation: मोठी बातमी : तनुश्री दत्ताला मल्हार पाटेकरचं उत्तर, नानांच्या मृत्यूवर बरळणाऱ्या अभिनेत्रीला म्हणाला...
मोठी बातमी : तनुश्री दत्ताला मल्हार पाटेकरचं उत्तर, नानांच्या मृत्यूवर बरळणाऱ्या अभिनेत्रीला म्हणाला...
BMC Action At Ajay Devgn Bungalow: अजय देवगणच्या बंगल्यातील अनधिकृत बांधकामावर हातोडा; BMC चे अधिकारी पोहोचले, भिंती, खिडक्या धडाधड तोडल्या, नेमकं प्रकरण काय?
अजय देवगणच्या बंगल्यातील अनधिकृत बांधकामावर हातोडा; BMC चे अधिकारी पोहोचले, भिंती, खिडक्या धडाधड तोडल्या, नेमकं प्रकरण काय?
Koffee With Karan 9 Salman Khan: 'माझं आयुष्य माझ्यासोबतच कबरीमध्ये दफन होईल...'; सलमान खानच्या वक्तव्यानं चाहते हादरले, नेमकं काय म्हणाला?
'माझं आयुष्य माझ्यासोबतच कबरीमध्ये दफन होईल...'; सलमान खानच्या वक्तव्यानं चाहते हादरले, नेमकं काय म्हणाला?

व्हिडीओ

SIR Election Commision And BJP : मुद्दा एसआयआरच्या घोळाचा, आरोप सत्तेच्या खेळाचा | Special Report ABP Majha
Shetitil Navdurga | Sarika Gaikwad | दुःखातून उभी राहिली, मातीतून यश घडवलं!
Sanjay Raut News : मी सर्वोच्च न्यायालयाची माफी मागतो… संजय राऊत यांची दिलगिरी; नेमकं काय म्हणाले?
Pune Election : मुख्यमंत्री म्हणाले, महायुती म्हणून एकत्र लढू, मात्र एकनाथ शिंदेंची वेगळी भूमिका,
Shetitil Navdurga : Rekha Rayate | ती स्वतः परदेशात गेली नाही, पण तिच्या 40 गुंठ्यांतली द्राक्षं परदेशात पोहोचली

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Student Protest: आता आणखी एका देशाच्या राजधानीत विद्यार्थ्यांचं आंदोलन पेटलं, पीएमओ, सरकारी इमारती अन् बँकांना आग लावली; जगाच्या पाठीवर भारत, फ्रान्स, जर्मनीसह 11 देशातील विद्यार्थ्यांचा रस्त्यावर आक्रोश
आता आणखी एका देशाच्या राजधानीत विद्यार्थ्यांचं आंदोलन पेटलं, पीएमओ, सरकारी इमारती अन् बँकांना आग लावली; जगाच्या पाठीवर भारत, फ्रान्स, जर्मनीसह 11 देशातील विद्यार्थ्यांचा रस्त्यावर आक्रोश
Gokul Election: गोकुळसाठी उद्या मतदान; सतेज पाटलांची कडवी झुंज, महायुतीने ठरावधारकांना यल्लमाच्या भंडारा, परडीवर हात मारून शपथाच घ्यायला लावल्या, निकराच्या लढाईत कोण बाजी मारणार?
गोकुळसाठी उद्या मतदान; सतेज पाटलांची कडवी झुंज, महायुतीने ठरावधारकांना यल्लमाच्या भंडारा, परडीवर हात मारून शपथाच घ्यायला लावल्या, निकराच्या लढाईत कोण बाजी मारणार?
शेतकऱ्यांना दिलेल्या 5 हजारांच्या मदतीवरुन टीका, फडणवीसांनी विरोधकांना सुनावलं; कर्नाटकचं उदाहरण दिलं
शेतकऱ्यांना दिलेल्या 5 हजारांच्या मदतीवरुन टीका, फडणवीसांनी विरोधकांना सुनावलं; कर्नाटकचं उदाहरण दिलं
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 17 ऑक्टोबर 2026 | शनिवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 17 ऑक्टोबर 2026 | शनिवार
Abhijeet Dipke: सीजेपीच्या अभिजीत दिपकेंची सशर्त जामिनावर सुटका; शांतता राखण्यासाठी बाँडवर सही सुद्धा घेतली
सीजेपीच्या अभिजीत दिपकेंची सशर्त जामिनावर सुटका; शांतता राखण्यासाठी बाँडवर सही सुद्धा घेतली
गोपीचंद पडळकरांना डोनाल्ड ट्रम्पही घाबरतात; चंद्रकांत पाटलांकडून दोन चॉकलेट देत आमदारास मोलाचा सल्ला
गोपीचंद पडळकरांना डोनाल्ड ट्रम्पही घाबरतात; चंद्रकांत पाटलांकडून दोन चॉकलेट देत आमदारास मोलाचा सल्ला
Gokul Election: कुठं नेऊन ठेवलं गोकुळ आमचं? महायुतीच्या नेत्यांनी गोकुळच्या निवडणुकीत यल्लमाच्या परडी आणि भंडाऱ्यावर हात मारून शपथ घ्यायला लावल्या! मुश्रीफ, धनंजय महाडिकांचा थेट व्हिडिओ व्हायरल
कुठं नेऊन ठेवलं गोकुळ आमचं? महायुतीच्या नेत्यांनी गोकुळच्या निवडणुकीत यल्लमाच्या परडी आणि भंडाऱ्यावर हात मारून शपथ घ्यायला लावल्या! मुश्रीफ, धनंजय महाडिकांचा व्हिडिओ व्हायरल
लोहगड केतन अग्रवाल मृत्यूप्रकरणात अखेर उज्ज्वल निकमांची नियुक्ती; कुटुंबीयांकडून CM फडणवीसांचे आभार
लोहगड केतन अग्रवाल मृत्यूप्रकरणात अखेर उज्ज्वल निकमांची नियुक्ती; कुटुंबीयांकडून CM फडणवीसांचे आभार
Embed widget