Palak Tiwari With Ibrahim Ali Khan :  श्वेता तिवारीची (Shweta Tiwari) मुलगी पलक तिवारीही (Palak Tiwari) अनेकदा चर्चेत असते. आईप्रमाणे तीही तिचे अॅक्टिंग स्किल्स वेळोवेळी सिद्ध करतेय. पलकने सलमान खानच्या (Salman Khan) चित्रपटातून बॉलिवूडमध्ये (Bollywood) पदार्पण केल्यापासून ती चर्चेत आहे. तिच्या प्रोफेशनल लाईफसोबतच ही अभिनेत्री तिच्या पर्सनल लाईफमुळे देखील चर्चेत असते. पलक अनेकदा इब्राहिम अली खानसोबत (Ibrahim Ali Khan) स्पॉट झाली आहे. त्यामुळे या स्टारकिड्सच्या अफेरच्या चर्चा सध्या सुरु आहेत. 


यावेळी देखील पलक तिवारी आणि इब्राहिम अली खान एकत्र स्पॉट झाले आहेत. पलक तिवारी इब्राहिम अली खानसोबत नाईट आऊटवर गेल्याचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतोय. या व्हिडिओमध्ये पलक आणि इब्राहिम एकाच कारमध्ये दिसत आहेत. यावेळी, सैफ अली खानचा मुलगा इब्राहिम कार चालवत असताना पलक त्याच्या बाजूला बसल्याचं पाहायला मिळत आहे. तसेच यावेळी या दोघांनीही ट्विनिंग केल्याचं पाहायला मिळालं. 


पलक इब्राहीम रिलेशनशिपमध्ये?


अनेक दिवसांपासून पलक तिवारी आणि इब्राहिम अली खानच्या अफेरच्या चर्चा सध्या सुरु आहेत. अनेकदा ते दोघे एकत्र स्पॉटही झाले आहेत. त्यामुळे  पलक इब्राहिमला डेट करत असल्याच्या चर्चा सुरु आहेत. अनेकदा हे दोघे एकत्र डेटवर जाताना देखील दिसले आहेत. पण पलकने तिच्या या डेटिंगच्या चर्चांना नेहमीच विरोध केलाय. तसेच ते दोघे फक्त चांगले मित्र असल्याचं पलकने म्हटलं. 


वर्क फ्रंटबद्दल बोलायचे झाले तर पलक तिवारीने 'किसी का भाई किसी की जान' या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. या चित्रपटातील तच्या अभिनयाचे खूप कौतुक झाले. यापूर्वी पलक हार्डी संधूसोबत बिजली म्युझिक व्हिडिओमध्ये दिसली होती. त्यांच्या या गाण्याने सर्वत्र खळबळ उडवून दिली. इब्राहिमबद्दल बोलायचे झाले तर सैफ अली खानचा लाडका 'सरज्मी' या चित्रपटातून तो अभिनयात पदार्पण करणार आहे. हा चित्रपट लवकरच प्रदर्शित होणार आहे. 






ही बातमी वाचा : 


Anant Ambani-Radhika Merchant Pre-Wedding : अनंत-राधिकाच्या प्री वेडिंगमध्ये खिलाडी कुमारचा धमाकेदार फरफॉर्मन्स, पण त्यासाठी अक्षयला मोडावा लागला त्याचा फार जुना नियम