Farah Khan On Rakhi Sawant : कोरियोग्राफर, डायरेक्टर आणि अनेक कार्यक्रमांच्या जज, सेलिब्रिटी फराह खान (Farah Khan) ही कायमच चर्चेत असते. नुकतच तिने एका मुलाखतीदरम्यान राखी सावंतचा (Rakhi Sawant) एका किस्सा शेअर केलाय. तसेच 'तीस मार खान'साठी कतरिनाला कास्ट करण्याचा विचार नव्हता असं देखील यावेळी तिनं म्हटलं. 'मैं हूं ना' या चित्रपटासाठी कास्टींग कसं केलं, राखीचं ऑडीशन कसं घेतलं, याविषयी देखील भाष्य केलं आहे.
'मैं हूं ना' ही फराह खानचा दिग्दर्शक म्हणून पहिलाच चित्रपट होता. फराह खानने कास्टिंग डायरेक्टर मुकेश छाब्रा यांना दिलेल्या मुलाखतीत अनेक किस्से शेअर केलेत. दार्जिलिंगमध्ये चित्रपटाचे शूटिंग सुरू झाल्यानंतर दोन दिवसांनी राखी सावंत 'मैं हूं ना'च्या शूटिंगमध्ये सामील झाली होती. तिने यापूर्वी आणखी एका अभिनेत्रीला कास्ट केले होते, मात्र तिच्या आईने शाहरुखसोबत त्याच हॉटेलमध्ये राहण्याची मागणी केली होती. त्यानंतर शुटींग सुरु झाल्यानंतर दोन दिवसांनी राखी चित्रपटाच्या शुटींगला आल्याचं फराह खानने सांगतिलं.
अशी झाली होती राखी सावंतची ऑडीशन
फराहने सांगितले की तिने तिच्या असिस्टंटला फोन केला आणि विचारले की या भूमिकेसाठी कोणाचे ऑडिशन होते. त्यावेळी मी त्याला जी आता उपलब्ध असेल तिला शुटींगसाठी पाठवायला सांगतलं. राखीच्या ऑडिशनविषयी बोलताना फराह खानने म्हटलं की, जेव्हा राखी ऑडीशनसाठी आली होती, तेव्हा ती बुरखा घालून आली होती. तेव्हा असिस्टंटला जरा धक्काच बसला. कारण ती भूमिका एका सॅसी मुलीची होती. मात्र, राखीने तिच्या खास शैलीत त्याला कॅमेरा फिरवण्यास सांगितले. तेव्हा तिने तो बुरखा काढून टाकला आणि आतमध्ये बिकीनी होती.
तिच्यासोबत काम करताना खूप छान वाटलं - फराह खान
राखी जेव्हा ऑडीशनला आली होती, तेव्हा आम्ही तिला लगेचच कास्ट केलं नाही. तेव्हा तिचे केसही केशरी रंगाचे होते. पण त्यानंतर ती दार्जिलिंगला शुटींगला आली. तेव्हा आम्ही तिला पूर्ण झाकत होतो कारण तिचा रोल तसा होता. तिचे केस लपवायचा प्रयत्न करत होतो. ती म्हणायची हे नको म्हणून तेव्हा मी तिला सांगायचे की तू अशी पण गोड दिसशील. राखीसोबत काम करणं खरंच खूप छन होतं. ती मला नेहमी एक सांगायची की मला शाहरुखच्या शेजारी किंवा त्याच्या मागे उभं करावं, असा किस्सा फराह खानने सांगितला.