एक्स्प्लोर
आयुष्मान-भूमी पुन्हा एकत्र, ‘शुभ मंगल सावधान’चा ट्रेलर रिलीज
‘दम लगा के हईशा’ या सुपरहिट सिनेमानंतर अभिनेता आयुष्मान खुराना आणि अभिनेत्री भूमी पेडणेकर पुन्हा एकदा एकत्र दिसणार आहेत. आयुष्मान आणि भूमी यांची मुख्य भूमिका असलेल्या आगामी ‘शुभ मंगल सावधान’ सिनेमाचा ट्रेलर रिलीज झाला आहे.

मुंबई : ‘दम लगा के हईशा’ या सुपरहिट सिनेमानंतर अभिनेता आयुष्मान खुराना आणि अभिनेत्री भूमी पेडणेकर पुन्हा एकदा एकत्र दिसणार आहेत. आयुष्मान आणि भूमी यांची मुख्य भूमिका असलेल्या आगामी ‘शुभ मंगल सावधान’ सिनेमाचा ट्रेलर रिलीज झाला आहे. नॉन कूल मुदित शर्मा आणि नॉन हॉट सुगंधा जोशी यांची विनोदी कहाणी यात पाहायला मिळणार असून, आनंद एल राय यांच्या कलर येलो प्रॉडक्शनखाली सिनेमाची निर्मिती करण्यात आली आहे. ‘शुभ मंगल सावधान’ हा सिनेमा ‘कल्याण समयाल साधम’ या सुपरहिट तामिळ सिनेमाचा रिमेक आहे. आर. एस. प्रसन्ना यांनी या सिनेमाचं दिग्दर्शन केले असून, 1 सप्टेंबर 2017 रोजी रिलीज होणार आहे. डबल मिनिंग जोक्स या सिनेमात असून, अडीच मिनिटांच्या या ट्रेलरवरुन लक्षात येतं की, सिनेमात कॉमिक लव्ह स्टोरी दाखवण्यात आली आहे. पाहा ट्रेलर :
Before You Go
Arjun Tendulkar Weds Saaniya Chandhok : अर्जुन-सानिया लग्नबंधनात ! स्टायलिश लूकने वेधलं लक्ष






















