Shreyas Talpade : मराठीसह हिंदी मनोरंजनसृष्टी गाजवणारा हरहुन्नरी अभिनेता श्रेयस तळपदे (Shreyas Talpade) नेहमीच कोणत्या ना कोणत्या कारणाने चर्चेत असतो. अभिनेत्याच्या आगामी कलाकृतींची चाहत्यांना उत्सुकता आहे. श्रेयस तळपदे अभिनीत 'करतम भुगतम' (Kartam Bhugtam) हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. नुकताच या बहुचर्चित चित्रपटाचा धमाकेदार ट्रेलर रिलीज झाला आहे. 'करतम भुगतम' या मनोवैज्ञानिक थरार, नाट्य असणाऱ्या चित्रपटाबाबतची प्रेक्षकांची उत्सुकता आता आणखी वाढली आहे. श्रेयस तळपदेने खास कॅप्शन देत या चित्रपटाचा ट्रेलर शेअर केला आहे. 


'काल' आणि 'लक'सारख्या चित्रपटांचं दिग्दर्शन केलेला सोहम पी शाह या चित्रपटाच्या दिग्दर्शनाची धुरा सांभाळत आहे. 'करतम भुगतम' या चित्रपटात प्रेक्षकांना एक मनोरंजक गोष्ट पाहायला मिळणार आहे. 'करतम भुगतम' या शब्दाचा अर्थ असा होतो की,"जसं होतं असतं, तसंच होतं". हा सिनेमा प्रेक्षकांना गुंतवून ठेवणारा आहे.


प्रेक्षकांना विचार करायला भाग पाडणारा 'करतम भुगतम'  


'करतम भुगतम' या चित्रपटासाठी सोहम पी. शाह उत्सुक आहेत. चित्रपटाबद्दल बोलताना ते म्हणाले,"श्रेयस, विराज राज, मधू आणि अक्षासारख्या कलाकारांसोबत काम करतानाचा अनुभव खूप भन्नाट आहे. अशा अभिनेत्यांसोबत काम करताना दिग्दर्शक म्हणून आपण समृद्ध होतो. वास्तविक गोष्ट मांडण्याची ही योग्य वेळ आहे. प्रेक्षक आजकाल खूप विचार करतात. गांधार फिल्म्स अँड स्टुडिओ प्रायव्हेट लिमिटेडचे विशेष आभार. हा चित्रपट रोमांचक असण्यासोबत प्रेक्षकांना विचार करायला लावणारा आहे". 






श्रेयस तळपदे काय म्हणाला?


श्रेयस तळपदे 'करतम भुगतम' या चित्रपटाबद्दल बोलताना म्हणाला,"चित्रपटाबाबतचा दिग्दर्शक सोहमचा दृष्टिकोण असाधारण आहे. दिग्दर्शकाने या चित्रपटाला एका वेगळ्या उंचीवर नेलं आहे. एका चांगल्या कलाकृतीचा भाग असल्याचा मला आनंद आहे. या चित्रपटामुळे मला प्रेरणा मिळाली आहे. आता या चित्रपटाची गोष्ट रुपेरी पडद्यावर पाहण्यासाठी प्रेक्षकांप्रमाणे मलाही उत्सुकता आहे". ट्रेलर शेअर करत श्रेयस तळपदेने लिहिलं आहे,"सिर्फ 10 दिन के लिए एक काम से न्यूझिलँडसे अपने शहेर आया था..एक ज्योतिषने कहा मैं कभी वापस नहीं जा पाऊंगा..अब मैं यहाँ फस चुका हूँ..क्या मैं कभी वापस आ पाऊंगा? या कभी नहीं? - देव जोशी (करतम भुगतम)". 


तगडी स्टारकास्ट असणारा 'करतम भुगतम'


'करतम भुगतम' या चित्रपटात श्रेयस तळपदे, विजय राज, मधू आणि अक्षा पारदासनी महत्त्वाच्या भूमिकेत झळकणार आहेत. 17 मे 2024 रोजी देशभरात हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे. हिंदी, तामिळ, तेलुगू, कन्नड आणि मल्याळम अशा पाच भाषांमध्ये हा चित्रपट प्रदर्शित होईल. ट्रेलर रिलीज झाल्याने प्रेक्षकांना आता सिनेमाची उत्सुकता आहे. 


संबंधित बातम्या


Shreyas Talpade :  'त्यानंतर मला त्रास होऊ लागला होता', श्रेयसला हृदयविकाराचा झटका येण्यामागे कोविडची लस कारणीभूत?