Preity Zinta Income From IPL:  सध्या क्रिकेटप्रेमी आयपीएलच्या (IPL) रंगात रंगले आहेत. यंदाच्या सीझनमध्ये मोठा उलटफेर झाला असून आता प्लेऑफमध्ये स्थान मिळवण्यासाठी टीम्स जीव तोडून प्रयत्न करत आहेत. बॉलिवूड सेलिब्रिटीदेखील आपल्या आवडत्या टीमला चिअर्स करण्यासाठी मैदानात जात आहेत. बॉलिवूड सेलिब्रिटींनीदेखील आयपीएलच्या टीममध्ये गुंतवणूक केली आहे. तर, काहींनी संघ विकत घेतले आहेत. शाहरुख खान, जुही चावला आणि प्रीती झिंटा यांनी आयपीएलमधील टीम विकत घेतले आहेत. प्रीती झिंटाने (Preitt Zinta) आयपीएलमधील पंजाब किंग्स इलेव्हन (Kings XI Punjab) हा संघ खरेदी केला आहे. 


प्रीती झिंटाच्या मालिकीच्या पंजाब किंग्स इलेव्हनची ब्रँड व्हॅल्यू खूपच चांगली आहे. या टीममध्ये प्रीती झिंटा, नेस वाडिया, करण पॉल आणि मोहित बर्मन यांनी  भागिदारकीमध्ये खरेदी केली होती. 2008 मध्ये या सगळ्यांनी 2:1:1 या प्रमाणातील भागिदारीत संघ खरेदी केला होता. यामध्ये करण आणि मोहित यांची भागिदारी 2 आणि नेस वाडिया, प्रीती झिंटा यांची भागिदारी 1-1 इतकी होती. 


पंजाब किंग्स इलेव्हनमधून प्रीतीची कमाई किती?


आयपीएलमधून मिळणारे उत्पन्न हे सूत्रानुसार वाटप केले जाते. आयपीएल सामना प्रक्षेपणाचे टीव्ही हक्क 23 हजार 575 कोटींना देण्यात आले. डिजीटल राइट्स 3257.50 कोटींना देण्यात आले. आयपीएलमधील टीम्सची चांगली कमाई होते. टीव्ही प्रक्षेपण आणि डिजीटल मीडियाचे हक्क विकल्यानंतर आलेल्या पैशांमधून बीसीसीआय आपला हिस्सा त्यातून घेतो आणि उर्वरित पैसे हे सर्व फ्रँचायझींमध्ये समान तत्वावर वाटप केले जातात. एका वृत्तानुसार, 50 टक्के रक्कम बीसीसीआयकडे आणि 50 टक्के फ्रँचायझीकडे जाते. इतकंच नाही तर पंजाब किंग्ज जाहिराती आणि प्रायोजकांच्या माध्यमातूनही करोडोंची कमाई करतात. त्यामुळे प्रीती झिंटा ही आयपीएलच्या एका हंगामात कोट्यवधींची कमाई करते.






किती केलीय गुंतवणूक?


प्रीतीने 2021 मध्ये पंजाब किंग्जमध्ये 350 कोटी रुपयांची गुंतवणूक केली होती. या संघात तिची 350 कोटींची भागीदारी आहे. प्रीती झिंटाच्या टीमने अजूनपर्यंत आयपीएलचा एकही सीझन जिंकलेला नाही. मात्र, मागील काही सीझनमध्ये किंग्स इलेव्हन पंजाब चांगली कामगिरी करत आहे.असे असले तरी प्रीती मात्र आयपीएलमधून चांगली कमाई करत आहे.  प्रीती झिंटा ही 'लाहोर 1947' या चित्रपटात झळकणार आहे.