Shreyas Talpade : अभिनेता श्रेयस तळपदेने (Shreyas Talpade) काही महिन्यांपूर्वी त्याच्या आयुष्यातला सगळ्यात कठिण प्रसंग अनुभवला होता. काही महिन्यांपूर्वी श्रेयसला हृदयविकाराचा झटका आला त्यानंतर श्रेयससाठी प्रत्येक ठिकाणी प्रार्थना होऊ लागली. तो काळ आणि त्यावेळी काय घडलं होतं, यावर श्रेयसने अनेकदा भाष्य केलंच आहे. नुकतच कोविड लशीवर अनेक शंका उपस्थित केल्या जात आहेत. त्यातच कोविड किंवा त्याची लस यापैकी एकाचा माझ्या हृदयविकाराच्या झटक्याशी नक्कीच संबंध असल्याचं श्रेयसने म्हटलं आहे.

Continues below advertisement

ॲस्ट्राझेनेका (AstraZeneca) कंपनीच्या खुलाशानंतर कोरोनाची लस घेणाऱ्या लोकांच्या मनात अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत. ॲस्ट्राझेनेकाने कंपनीने न्यायालयात कबूल केले आहे की, कोविशिल्डमुळे थ्रोम्बोसाइटोपेनिया सिंड्रोम (TTS) म्हणजेच थ्रोम्बोसिस होऊ शकते. यामुळे रक्ताच्या गुठळ्या तयार होतात आणि प्लेटलेटची संख्या कमी होते. थ्रोम्बोसाइटोपेनियाच्या गंभीर प्रकरणांमध्ये, यामुळे ब्रेन स्ट्रोक आणि हृदयविकाराचा झटका देखील येऊ शकतो. त्यातच आता श्रेयसने देखील त्याच्या हृदयविकाराच्या झटक्याविषयी सविस्तर  भाष्य केलं आहे. 

श्रेयसने काय म्हटलं? 

तो कठिण प्रसंग आठवत श्रेयसने म्हटलं की,  'ती अत्यंत अनपेक्षित अशी वेळ होती. आपल्याला वाटतं की आपण सगळी काळजी घेत आहोत. व्यायाम, डाएट सगळ्या गोष्टी करतोय. पण तुम्हाला माहित नसतं कधी काय घडेल. त्यातच आता या सगळ्यावर कोविड लशीचा देखील संबंध असल्याचं आता म्हटलं जात आहे. आपण हल्ली असे अनेक किस्से ऐकतो, कि आता चांगला होता आणि अचानक असं काहीतरी झालं. मग या सगळ्याला काय कारण असू शकतं. मी धुम्रपान करत नाही, मी दररोज दारु पीत नाही, तंबाखू वैगरे मला व्यसन नाही. होय माझं कलेस्ट्रोल नक्कीच जास्त होतं, पण मला सांगितलं होतं की हे नॉर्मल आहे. त्यासाठीही मी औषधं घेत होतो. मला डाएबिटीज नाही, बीपी नाही मग दुसरं कारण काय असू शकतं. मला खायलाही खूप आवडतं, पण म्हणून मी जास्त बाहेरचंही खात नाही. जेवढी काळजी घेता येईल तेवढी घेत होतो.' 

Continues below advertisement

तुला असं वाटतं का की त्यामुळे तुला हृदयविकाराचा झटका आला? या प्रश्नाचं उत्तर देताना श्रेयसने म्हटलं की, 'मी या थिअरली नक्कीच नाकारणार नाही. पण होय कोविडची लस घेतल्यानंतर मला जास्त थकवा जाणवू लागला होता. पण कदाचित मला लसीकरण किंवा कोविडमुळे हा त्रास झाला असले,हेही मी नाकारु शकत नाही. पण आता हे नक्की कशामुळे झालं, हे मलाही सांगता येणार आहे. मात्र यापैकी एका गोष्टीचा याच्याशी नक्कीच संबंध आहे.' 

मला ते जाणून घ्यायचं आहे - श्रेयस तळपदे

'आपण आपल्या शरीरासाठी कोणती लस घेतली, त्यामध्ये काय होतं, याची कल्पना आपल्या कोणालाच नाही, ही अत्यंत दु्र्दैवाची गोष्ट आहे. अर्थात आपण सगळ्यांनीच संबंधित कंपनीवर विश्वास ठेवला. त्यामुळे या सगळ्याचा आपल्या शरीरावर नेमका काय परिणाम झालाय हे मलाही जाणून घ्यायचं आहे. पण माझ्या हार्टअटॅक मागे कोविडची लस कारणीभूत आहे, हे मी देखील ठामपणे सांगू शकत नाही, असं यावेळी श्रेयसने म्हटलं.  

ही बातमी वाचा : 

Saie Tamhankar : मराठमोळी सई पुन्हा बॉलीवूड गाजवायला सज्ज, अग्नी सिनेमात झळकणार 'या' कलाकारासह