Shreyas Talpade: अभिनेता  श्रेयस तळपदेला (Shreyas Talpade) 14 डिसेंबर रोजी हृदयविकाराचा झटका आला. त्यानंतर त्याला तात्काळ  रुग्णालयात दाखल करण्यात आले. डॉक्टरांनी श्रेयसवर अँजिओप्लास्टी केली. आता श्रेयस तळपदेची प्रकृती पूर्वीपेक्षा चांगली असून त्याला लवकरच रुग्णालयातून डिस्चार्ज मिळणार आहे, असं म्हटलं जात आहे. श्रेयसचा जळचा मित्र आणि फिल्ममेकर सोहम शाहनं नुकतीच श्रेयसच्या हेल्थबाबत अपडेट दिली आहे.


काय म्हणाला सोहम शाह? (Shreyas Talpade Health Update)


श्रेयस तळपदेचा जवळचा मित्र आणि फिल्ममेकर  सोहम शाहने श्रेयसच्या तब्येतीची माहिती दिली आहे. त्याने ई टाइम्सला सांगितले की, 'मी हॉस्पिटलमध्ये गेलो होतो. श्रेयसची प्रकृतीत बरीच सुधारणा झाली आहे. त्याची प्रकृती आता स्थिर आहे. आज (रविवार) रात्री किंवा उद्या सकाळी (सोमवार) त्याला डिस्चार्ज मिळेल, असे डॉक्टरांनी सांगितले आहे. आज सकाळी तो आमच्याकडे पाहून हसला. आम्हा सर्वांसाठी हा दिलासा होता."


पुढे सोहम शाहने सांगितले, "मी दीप्तीचे देखील मनापासून आभार मानू इच्छितो की, तिने योग्य वेळी योग्य निर्णय घेतला. श्रेयस तळपदेला हृदयविकाराचा झटका आल्यानंतर  विलंब न करता त्याला रुग्णालयात दाखल करणे खूप आव्हानात्मक होते. अशा स्थितीत दीप्तीच्या विचारांचे कौतुक करावेसे वाटते. मी देवाचे देखील आभार मानतो कारण तो बरा होत आहे आणि सर्वांच्या शुभेच्छा त्याच्यासोबत आहेत."


14 डिसेंबर रोजी वेलकम टू जंगल या चित्रबपटाच्या शुटींगला गेला होता. त्याने दिवसभर शुटींग केले आणि तो पूर्णपणे ठिक होता. त्यानंतर तो घरी परतला. त्याने त्याची पत्नी दिप्ती हिला सांगितले की, थोडं अस्वस्थ वाटतंय. तिने ताडडीने त्याला रुग्णायलात नेले पण वाटेतच श्रेयसला हृदयविकाराचा झटका आला. 


श्रेयसची पत्नी दिप्ती तळपदेने काही दिवसांपूर्वी एक पोस्ट शेअर करुन श्रेयसच्या प्रकृतीबाबत माहिती दिली होती. या पोस्टमध्ये तिनं लिहिलं होतं, "तुमच्या शुभेच्छांबद्दल मी आभार व्यक्त करते. श्रेयसची प्रकृती आता स्थिर आहे. लवकरच त्याला रुग्णालयातून डिस्चार्ज मिळेल. श्रेयसवर उपचार करणाऱ्या डॉक्टरांचेही आभार."


वेलकम टू जंगल या चित्रपटात  अक्षय कुमार, रवीना टंडन, दिशा पटानी, जॅकलीन फर्नांडिस, लारा दत्ता, सुनील शेट्टी, संजय दत्त, परेश रावल, अर्शद वारसी, तुषार कपूर, राजपाल यादव, जॉनी लिव्हर, किकू शारदा, कृष्णा अभिषेक हे कलाकार प्रमुख भूमिका साकारणार आहेत. काही दिवसांपूर्वी अक्षय कुमारनं या चित्रपटाच्या शूटिंगदरम्यानचा एक व्हिडीओ देखील सोशल मीडियावर शेअर केला होता. 


संबंधित बातम्या"


Shreyas Talpade Health : "10 मिनिटांसाठी त्याचं हृदय बंद पडलं होतं"; श्रेयस तळपदेच्या प्रकृतीबाबत बॉबी देओलची माहिती