Chris Gayle And Shah Rukh Khan: बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेता शाहरुख खानच्या (Shah Rukh Khan) डंकी (Dunki) या चित्रपटाची प्रेक्षक उत्सुकतेने वाट बघत आहेत. या चित्रपटातील ओ माही, लूट पूट गया (Lutt Putt Gaya) ही दोन गाणी प्रेक्षकांच्या भेटीला आली. यामधील लूट पूट गया या गाण्यातील शाहरुखच्या डान्सनं अनेकांचे लक्ष वेधले. आता क्रिकेटर  ख्रिस गेलनं (Chris Gayle) देखील लूट पूट गया या गाण्यावर डान्स केला आहे. त्याच्या या डान्सचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या व्हिडीओवर शाहरुख खाननं प्रतिक्रिया देखील दिली आहे.


ख्रिस गेलचा डान्स पाहून शाहरुख म्हणाला... (Chris Gayle Dance On Lutt Putt Gaya)


डिजिटल क्रिएटर प्रिया जेठानीसोबत ख्रिस गेलनं लूट पूट गया या गाण्यावर डान्स केला आहे. हा व्हिडीओ पाहिल्यानंतर शाहरुखनं ट्विटरवर प्रतिक्रिया दिली आहे. त्यानं ट्वीटमध्ये लिहिलं, "आणि युनिवर्स बॉसनं देखील डान्स केला. थँक्यू माय मॅन,आपण लवकरच भेटूयात आणि एकत्र  लूट पूट गया या गाण्यावर डान्स करूयात"






कधी रिलीज होणार डंकी?


शाहरुख खानच्या डंकी या चित्रपटातील लूट पूट गया गाणं काही दिवसांपूर्वी रिलीज झालं.हे गाणं सोशल मीडियावर शेअर करुन शाहरुखनं कॅप्शनमध्ये लिहिलं, "या गाण्याच्या वेळी अजून उंच उडी मारली असती तर मी उडून गेले असते.मला आशा आहे की, हा रोमान्स तापसी आणि तुमच्या हृदयात नक्कीच तंबू करेल". अरिजित सिंहनं  लूट पूट गया हे गाणे गायले आहे.


शाहरुख आणि तापसी यांच्यासोबतच डंकी या चित्रपटात बोमन इराणी, विकी कौशल, विक्रम कोचर आणि अनिल ग्रोव्हर यांच्याही भूमिका आहेत. अभिजात जोशी, राजकुमार हिराणी आणि कनिका धिल्लन  यांनी डंकी या चित्रपटाचे कथानक लिहिले आहे. 21 डिसेंबरला डंकी हा रिलीज होणार आहे. शाहरुखचे चाहते या चित्रपटाची उत्सुकतेने वाट बघत आहेत.


संबंधित बातम्या:


Shah Rukh Khan: शाहरुखच्या 'डंकी'ला सेन्सॉरकडून मिळालं U/A सर्टिफिकेट; किती तासांचा असणार चित्रपट? जाणून घ्या