Shreya Bugade Post On Ganapati Bappa Visarjan : राज्यभरात गणेशोत्सवाची धूम पाहायला मिळत आहे. नेते मंडळी, सेलिब्रिटीही अनेक गणेश मंडळांना भेट देत बाप्पाचं दर्शन घेत आहेत. सेलिब्रिटींच्या घरीदेखील गणराय विराजमान झाले आहेत. बाप्पा आल्यावर सर्वत्र आनंददायी वातावरण निर्माण होतं. पण बाप्पाला निरोप देताना मात्र सर्वसामान्यांप्रमाणे सेलिब्रिटीही भावूक होतात. अभिनेत्री श्रेया बुगडेलाही (Shreya Bugade) बाप्पाला निरोप देताना अश्रू अनावर झाले आहेत. 


श्रेया बुगडेची पोस्ट काय? (Shreya Bugade Post)


बाप्पाला निरोप देताना श्रेया बुगडेला अश्रू अनावर झाले असून तिने भावूक पोस्ट शेअर केली आहे. श्रेया बुगडेने पोस्ट शेअर करत लिहिलं आहे,"काल 'निरोप घेता आता आम्हा आज्ञा असवी. चुकले आमचे काही त्याची क्षमा असवी', असे म्हणत तुझा निरोप घेतला आणि नेहमीसारखे अश्रू अनावर झाले". 






श्रेयाने पुढे लिहिलं आहे,"गेल्या इतक्या वर्षात या पाच दिवसात तुझ्यासमोर हात जोडताना काही मागितल्याचं मला आठवत नाही. पण एक सांगेन या पाच दिवसात तुझ्या येण्याने जेवढा आनंद मला मिळतो तो मला कधीच शब्दात मांडता येणार नाही. तुझ्या निमित्ताने सगळी माझी प्रेमाची माणसं एकत्र येतात. तुझं कौतुक करतात..तेव्हा मनाला होणारा आनंद गगनात मावेनासा असतो...ही प्रथा वर्षांनुवर्षे अशीच चालू ठेव...तुझी सेवा करायची संधी आम्हाला देत राहा". 


श्रेया बाप्पाला म्हणते,"विसर्जन फक्त म्हणायला रे, बाकी माझ्यासोबत तू असतोसच की कायम दिसत राहतोस...कधी कामात, कधी माणसांमध्ये माझ्यावर अतोनात नि:स्वार्थ प्रेम करणारी माणसं माझ्या आयु्यात आहेत आणि हा तू मला दिलेला सगळ्यात मोठा आशीर्वाद आहे. मम्मा म्हणते कसं "जाते नाही येते म्हणावं गं". मग आता..ये लवकर पुढच्या वर्षी आनंदाने..तुला सगळ्यासाठी खूप थँक्यू आणि एक घट्ट मिठी (तुला तर माहिती आहे आपलं..) सुखी राहा..आनंदात राहा...तुला खूप प्रेम...भेटूच". 


श्रेया बुगडे आणि बाप्पाचं खूप खास नातं आहे. गणेशोत्सव हा अभिनेत्रीचा आवडता सण आहे. श्रेयाच्या पोस्टवर खूप छान लिहिलं आहे, गणपती बाप्पा मोरया, किती सुंदर, अप्रतिम लिहिलं आहेस, अशा कमेंट्स चाहत्यांनी केल्या आहेत. श्रेया बुगडेच्या घरी पाच दिवसांचा बाप्पा असतो. त्यामुळे आता ती बाप्पाच्या आठवणीत रमली आहे. 


संबंधित बातम्या


Prathamesh Parab : बाप्पाच्या आशीर्वादासाठी जशी गर्दी होते तशी आमच्या सिनेमासाठीही व्हावी; प्रथमेश परबचं बाप्पाकडे मागणं