Chandramukhi 2 Hindi Trailer Out : बॉलिवूडची 'पंगा क्वीन' कंगना रनौत (Kangana Ranaut) कधी सिनेमामुळे तर कधी वादग्रस्त वक्तव्यामुळे चर्चेत असते. आता अभिनेत्री तिच्या आगामी 'चंद्रमुखी 2' (Chandramukhi 2) या सिनेमामुळे चर्चेत आहे. आता या सिनेमाचा हिंदी ट्रेलर रिलीज झाला आहे. त्यामुळे प्रेक्षकांची सिनेमाबद्दलची उत्सुकता आणखी वाढली आहे.


'चंद्रमुखी 2'च्या ट्रेलरमध्ये काय आहे? (Chandramukhi 2 Trailer Out)


'चंद्रमुखी' हा सिनेमा 2005 मध्ये प्रेक्षकांच्या भेटीला आला होता. आता या सिनेमाचा दुसरा भाग अर्थात 'चंद्रमुखी 2' हा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीसाठी सज्ज आहे. 'चंद्रमुखी 2'च्या हिंदी ट्रेलरच्या सुरुवातीला एक व्यक्ती चंद्रमुखीची 17 वर्षांपूर्वीची गोष्ट एका कुटुंबाला ऐकवताना दिसत आहे. तसेच पंगाक्वीन कंगना रनौतची एक झलक पाहायला मिळत आहे. अभिनेत्रीच्या रौद्र रुपाने प्रेक्षकांचं लक्ष वेधून घेतलं आहे. राघव लॉरेंस यांचा अॅक्शन मोडदेखील प्रेक्षकांना पाहायला मिळत आहे. चंद्रमुखी आणि वेट्टैयन आमने-सामने आल्यानंतर काय होणार हे पाहण्यासाठी प्रेक्षक उत्सुक आहेत.






'चंद्रमुखी 2' या सिनेमातील भूमिकेसाठी कंगना रनौतने खूप मेहनत घेतली आहे. या सिनेमासाठी ती खास शास्त्रीय नृत्य शिकली आहे. 'चंद्रमुखी 2'चा ट्रेलर आऊट झाल्यानंतर चाहते कमेंट्स करत सिनेमासाठी उत्सुक असल्याचं सांगत आहेत. ज्या भयपटात राघव असेल तो उत्तमच होणार, कंगनाचा सिनेमा सुपरहिट होणार, कमाल ट्रेलर अशा कमेंट्स चाहत्यांनी केल्या आहेत. 


'चंद्रमुखी 2' कधी होणार रिलीज? (Chandramukhi 2 Release Date)


कंगना रनौतचा 'चंद्रमुखी 2' (Chandramukhi 2) हा एक हॉरर सिनेमा आहे. 28 सप्टेंबरला हा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. आधी हा सिनेमा 15 ऑगस्टला प्रेक्षकांच्या भेटीला येणार होता. पण नंतर या सिनेमाची रिलीज डेट पुढे ढकलण्यात आली. आता 'चंद्रमुखी 2' आणि 'फुकरे 3' हे सिनेमे आमने-सामने येणार आहेत. 


'चंद्रमुखी 2' या सिनेमात कंगना रनौतसह राधिका सरथकुमार, वादिवेलू, लक्ष्मी मेनन, महिमा नांबियार, सृष्टी डांगे, रवी मारिया आणि सुरेश मेनन हे कलाकार महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहेत. कंगनाचा 'चंद्रमुखी 2' हा सिनेमा ब्लॉकबस्टरर होणार आहे. तामिळ, तेलुगू, हिंदी, मल्याळम आणि कन्नड या भाषांमध्ये हा सिनेमा प्रदर्शित होईल. या सिनेमात प्रेक्षकांना अॅक्शन, हॉरर आणि रोमान्स पाहायला मिळेल.


संबंधित बातम्या


Kangana Ranaut : 'Chandramukhi 2' सिनेमातील कंगना रनौतचा फर्स्ट लूक आऊट! शाही अंदाजात दिसली 'पंगाक्वीन'