Ashoke Pandit On Shraddha Walkar : दिल्लीतील श्रद्धा वालकर हत्याकांड प्रकरण (Shraddha Murder Case) सध्या देशभरात चर्चेत आहे. श्रद्धाचा प्रियकर आफताबनं तिची गळा दाबून हत्या केली. त्या मृतदेहाचे त्याने 35 तुकडे केले आणि त्यांची टप्प्याटप्प्याने विल्हेवाट लावायला सुरुवात केली. या प्रकरणावर देशातील नागरिकांसह बॉलिवूड सेलिब्रिटीदेखील आपल्या प्रतिक्रिया देत आहेत. दरम्यान सिने-दिग्दर्शक अशोक पंडितने (Ashoke Pandit) श्रद्धा वालकर हत्या प्रकरणावर प्रतिक्रिया न देणाऱ्या बॉलिवूड सेलिब्रिटींवर निशाणा साधला आहे. 


श्रद्धा वालकर हत्याकांड प्रकरणावर अशोक पंडितने ट्वीट करत बॉलिवूड कलाकारांवर निशाणा साधला आहे. श्रद्धा वालकर हत्याकांड प्रकरण देशभरात गाजत असताना बॉलिवूड शांत कसं राहू शकतं असा प्रश्न अशोकने उपस्थित केला आहे. अशोकने ट्वीट केलं आहे,"मित्रांनो एवढी शांतता का आहे..? आफताब पूनावालाने श्रद्धा वालकरची हत्या केली आहे...यावर तुम्हाला काहीच प्रतिक्रिया द्यायची नाही". हे ट्वीट शेअर करत अशोकने श्रद्धा वालकर हत्याकांड प्रकरणावर संतप्त प्रतिक्रिया देणाऱ्या बॉलिवूड कलाकारांचे फोटो शेअर केले आहेत. 






अशोकचं ट्वीट सध्या चांगलच व्हायरल होत आहे. 'त्या कलाकारांना सापाने दंश केलं आहे', 'नौटंकी कलाकार आहेत', 'सामाजिक विषयांवर भाष्य करायला हे कलाकार नेहमीच मागे राहतात', अशा कमेंट्स नेटकरी करत आहेत. तसेच ज्या कलाकारांनी श्रद्धा वालकर हत्याकांड प्रकरणावर भाष्य केलं आहे त्यांचं कौतुकदेखील करत आहेत. 










अशोकआधी राम गोपाल वर्मानं ट्वीट केलं आहे,'केवळ कायद्याच्या भीतीने क्रूर हत्या रोखता येत नाहीत. पण त्या घटनेचा बळी ठरलेल्या व्यक्तीच्या आत्म्यानं परत येऊन मारेकऱ्यांना मारले तर ते नक्कीच हे थांबवता येईल. देवाने याचा विचार करावा आणि आवश्यक ते करावे ही विनंती. तिच्या आत्म्याला शांती मिळण्याऐवजी परत यावे आणि त्याचे 70 तुकडे करावे' राम गोपाल वर्माच्या या ट्वीटनं अनेकांचे लक्ष वेधलं आहे. 










नेमकं प्रकरण काय?


श्रद्धा वालकर हत्याकांड प्रकरणी आफताब अमीन पूनावाला याला अटक केल्यानंतर सहा महिन्यांनी ही अत्याचारी घटना उघडकीस आल्याची माहिती पोलीस अधिकाऱ्यांनी दिली आहे. पोलीस तपासात समोर आलेल्या माहितीनुसार, पोलिसांना श्रद्धाच्या शरीराचे काही अवशेष सापडले आहेत. सध्या पोलीस हत्येसाठी वापरण्यात आलेल्या शस्त्राचा शोध घेत आहेत. आफताब पूनावालानं पोलिसांना तपासादरम्यान सांगितलं की, "हत्येपूर्वी काही दिवस श्रद्धानं आफताबच्या मागे लग्नासाठी तगादा लावला होता. वैतागल्यामुळे रागाच्या भरात श्रद्धाची हत्या केली.'


संबंधित बातम्या


Ram Gopal Varma: श्रद्धा हत्याकांड प्रकरणावर राम गोपाल वर्माची प्रतिक्रिया; म्हणाला, "तिच्या आत्म्यानं परत यावं अन् त्याचे 70 तुकडे करावेत..."