Amit Bhatt in Taarak Mehta Ka Ooltah Chashmah : 'तारक मेहता का उल्टा चष्मा' (Taarak Mehta Ka Ooltah Chashmah) ही छोट्या पडद्यावरची लोकप्रिय मालिका आहे. गेल्या काही वर्षांपासून ही मालिका प्रेक्षकांचं मनोरंजन करत आहे. या मालिकेतील प्रत्येक पात्र प्रेक्षकांच्या पसंतीस उतरत आहे. सध्या या मालिकेतील 'चंपक चाचा' म्हणजेच 'बापूजी' अर्थात अमित भट्ट (Amit Bhatt) यांना मालिकेच्या सेटवर दुखापत झाली आहे. 


ई टाइम्सने दिलेल्या माहितीनुसार, 'चंपक चाचा' यांना मालिकेच्या सेटवर दुखापत झाली आहे. तसेच डॉक्टरांनी त्यांना पूर्णपणे आराम करण्याचा सल्ला दिला आहे. त्यामुळे सध्या ते शूटिंग करू शकत नाहीत. मालिकेतील एका दृश्यादरम्यान अमित भट्ट यांना पळायचं होतं. पण पळताना त्यांचा तोल गेला आणि ते पडले. त्यामुळे सध्या ते बेड रेस्टवर असून शूटिंगपासून लांब राहणार आहेत". 


'तारक मेहता का उल्टा चष्मा' मालिकेतील कलाकार अमित भट्ट यांच्या प्रकृतीत लवकरात लवकर सुधारणा व्हावी यासाठी प्रार्थना करत आहेत. 'तारक मेहता का उल्टा चष्मा' या मालिकेसह अमित भट्ट 'सीआईडी', 'खिचडी', 'एफआयआर' अशा अनेक लोकप्रिय मालिकांमध्ये दिसून आले आहेत. 






'तारक मेहता का उल्टा चष्मा' या मालिकेचा 28 जुलै 2008 रोजी पहिला भाग प्रेक्षकांच्या भेटीस आला होता. या मालिकेतील जेठालाल, सोढी, अंजली भाभी, दयाबेन, डॉ. हाथी आणि भिडे सर्वच भूमिका प्रेक्षकांच्या पसंतीस उतरत आहेत. आजही ही मालिका प्रेक्षकांचं मनोरंजन करण्यात यशस्वी ठरते आहे. 






अभिनेत्री राखी विज दयाबेन ही भूमिका साकारणार आहे, अशी चर्चा सोशल मीडियावर सुरू होती. पण राखीनं ही अफवा असल्याचं सांगितलं होतं. राखी विजाननं तिचा आणि दिशा वकानीचा फोटो असलेल्या एका बातमीचा स्क्रिनशॉट शेअर केला होता. या पोस्टमध्ये राखीनं लिहिलं, 'ही अफवा आहे. मी हे ऐकून थक्क झाले होते. मला मालिकेच्या प्रोड्यूसरकडून किंवा चॅनलकडून अजून कोणीही अप्रोच केलं नाही. ' 90 च्या दशकातील हिट मालिका 'हम पांच' मधील‘स्वीटी माथूर’या भूमिकेमुळे राखी विजानला विशेष लोकप्रियता मिळाली. 


संबंधित बातम्या


Saleel Kulkarni : 'अन् अचानक समोर गोकुळधाम दिसलं'; सलील कुलकर्णींची पोस्ट व्हायरल