Shraddha Kapoor Upcoming Film : बॉलिवूड अभिनेत्री श्रद्धा कपूरच्या स्त्री 2 चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर चांगलाच धमाका केला. या चित्रपटाने फक्त भारतातच नाही, तर जगभरात कोट्यवधींचा गल्ला जमवला. अनेक आठवडे स्त्री 2 चित्रपटाचा थिएटरमध्ये दबदबा पाहायला मिळाला. स्त्री 2 चित्रपटाने जगभरात 857 कोटी रुपयांचं कलेक्शन केलं. या चित्रपटामुळे अभिनेत्री श्रद्धा कपूरची प्रसिद्धीही वाढली. स्त्री 2 चित्रपटानंतर श्रद्धा कपूरची क्रेझ फक्त भारतातच नाहीतर, जगभरात पाहायला मिळत आहे. यामुळे श्रद्धा कपूरला मोठे मोठे प्रोजेक्ट्स ऑफर केले जात असल्याची माहिती आहे. आता श्रद्धा कपूरच्या हाती एक बिग बजेट चित्रपट लागल्याची माहिती समोर आली आहे.
आता 'नागिण' बनणार 'स्त्री'
श्रद्धा कपूरची वाढती क्रेझ आणि फॅन फॉलोईंग पाहता चित्रपट निर्माते आणि दिग्दर्शक तिच्यासोबत काम करण्यासाठी उत्सुक आहे. सध्या श्रद्धा कपूरकडे अनेक निर्माते-दिग्दर्शकांची रांग पाहायला मिळत आहे. तिला अने चित्रपटांच्या ऑफर्स मिळत आहेत. आता समोर आलेल्या माहितीनुसार, श्रद्धा कपूर एका बिग बजेट चित्रपटात झळकणार आहे. स्त्री 2 चित्रपटानंतर आता श्रद्धा कपूर इच्छाधारी 'नागिण' बनणार आहे. बॉलिवूड हंगामाच्या रिपोर्टमध्ये ही माहिती समोर आली आहे.
श्रद्धा कपूरच्या आगामी चित्रपटाबाबत मोठी अपडेट
या मीडिया रिपोर्टनुसार, श्रद्धा कपूर तिच्या आगामी बिग बजेट चित्रपटात इच्छाधारी नागिणच्या भूमिकेत दिसणार आहे. निर्माता निखिल द्विवेदी आगामी 'नागिण' चित्रपटाची तयारी करत आहेत. या आगामी बिग बजेट चित्रपटाती श्रद्धा कपूर मूख्य भूमिकेत दिसणार आहे. निखिल द्विवेदीने इंडिया टुडेला दिलेल्या मुलाखतीत म्हटलं आहे की, या भूमिकेसाठी श्रद्धा कपूर त्यांची पहिली पसंत होती. श्रद्धा कपूरला या चित्रपटासाठी खूप आधीच फायनल गेलं केलं होतं, असंही त्यांनी सांगितलं आहे.
तीन वर्षांपासून सुरु होत स्क्रिप्ट तयार करण्याचं काम
निर्माता निखिल द्विवेदी यांनी आगामी प्रोजेक्टबद्दल बोलताना सांगितलं की, चित्रपटाची स्क्रिप्ट तयार आहे. स्क्रिप्ट पूर्ण होण्यासाठी तब्बल तीन वर्षांचा कालावधी लागला. तीन वर्षात त्या स्क्रिप्टमध्ये अनेक बदल करण्यात आले, पण आता अखेर स्क्रिप्ट पूर्ण झाली आहे.
त्यांनी यावेळी म्हटलं की, हा पूर्णपणे नवीन विषय आहे, ज्याचा कोणत्याही जुन्या चित्रपटाशी किंवा मालिकेशी कोणताही संबंध नाही. भारतीय लोककथा खूप समृद्ध आहेत आणि त्यातून अनेक नवनवीन कल्पनाही येतात म्हणून या विषयावर चित्रपट बनवण्याचा निर्णय घेण्यात आला, असंही त्यांनी सांगितलं.
महत्त्वाच्या इतर बातम्या :