Shraddha Kapoor Instagram Followers : बॉलिवूड अभिनेत्रींच्या तुलनेत श्रद्धा कपूर (Shraddha Kapoor) खूपच कमी चर्चेत असते. तिच्या साधेपणामुळे ती प्रेक्षकांच्या पसंतीस उतरते. सिनेसृष्टीत कमी चर्चेत असलेली श्रद्धा कपूर इंस्टाग्रामरवर मात्र खूप अॅक्टिव्ह असते. आता तिने इंस्टाग्रामवर 75 मिलियनचा टप्पा पार केला आहे.
श्रद्धा कपूरने आलिया भट्ट, दीपिका पदुकोण आणि कतरिना कैफ या बॉलिवूडमधील आघाडीच्या अभिनेत्रींना मागे टाकलं आहे. त्यामुळे सध्या श्रद्धा चर्चेत आली आहे. इन्स्टाग्रामवर श्रद्धाचे 75 मिलियन फॉलोअर्स झाले आहेत. श्रद्धाने सोशल मीडिया पोस्ट शेअर करत चाहत्यांना आनंदाची बातमी दिली आहे.
आघाडीच्या अभिनेत्रींचे फॉलोअर्स किती?
दीपिकाचे इंस्टाग्रामवर 69.9 मिलियन फॉलोअर्स आहेत. तर कतरिनाला 68 मिलियन मंडळी फॉलो करतात. आलियाच्या फॉलोअर्सची संख्या 72.4 मिलियन आहे. तर दिशाचे 54 मिलियन आणि अनुष्का शर्माचे 61 मिलियन फॉलोअर्स आहेत. दुसरीकडे देसी गर्ल प्रियांका चोप्राचे मात्र 81.9 मिलियन फॉलोअर्स आहेत. त्यामुळे सध्या सोशल मीडियावर प्रियांकाचा दबदबा आहे.
गेल्या 12 वर्षांपासून श्रद्धा कपूर इंडस्ट्रीत आहे. 2010 साली 'तीन पत्ती' या सिनेमाच्या माध्यमातून श्रद्धाने सिनेसृष्टीत पदार्पण केलं. पण 'आशिकी 2' या सिनेमाच्या माध्यमातून तिला लोकप्रियता मिळाली. हा सिनेमा चांगलाच हिट ठरला. या सिनेमामुळे श्रद्धा रातोरात स्टार झाली. त्यानंतर तिने 'एक व्हिलन', 'हैदर', 'बागी', 'हाफ गर्लफ्रेंड', 'हसिना पारकर','बत्ती गुल मीटर चालू', 'स्त्री', 'छिछोरे' यांसारख्या सिनेमांत काम केलं.
संबंधित बातम्या