Mushtaaq Merchant : 'शोले' ‘Sholay’,'सीता और गीता' ‘Seeta Aur Geeta’ अशा अनेक सिनेमांत मुश्ताक मर्चंट (Mushtaaq Merchant) यांनी काम केले होते. मुश्ताक मर्चंट यांनी आज वयाच्या 67 व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला आहे. मुश्ताक मर्चंट यांचे आज सकाळी 11.20 वाजता मुंबईतील होली फॅमिली रुग्णालयात निधन झाले.
मुश्ताक मर्चंट यांचे अत्यंत जवळचे मित्र हनिफ झवेरी म्हणाले, मुश्ताक गेल्या 10-12 वर्षांपासून मधुमेहाने त्रस्त होते. तब्येत बिघडल्याने त्यांना सकाळी रुग्णालयात दाखल करण्यात आले. पण त्यानंतर काही तासांतच त्यांचा मृत्यू झाला आहे.
'जवानी दीवानी' हा मुश्ताक मर्चंट यांचा पहिला सिनेमा होता. त्यानंतर त्यांनी 'हाथ की सफाई', 'शोले', 'सीता और गीता', 'सागर', 'समद', 'खून भरी मांग', 'गंगा जमुना सरस्वती' यांसारख्या 150 हून अधिक चित्रपटांमध्ये काम केले आहे. काही सिनेमांचे लेखन करण्यासोबतच त्यांनी अनेक नाटकांचेदेखील लेखन केले आहे.
मुश्ताक यांनी १६ वर्षांपूर्वी अभिनय सोडला होता. त्यानंतर त्यांनी स्वत:ला धार्मिक कामात व्यस्त केले. त्यांचे अंतिम संस्कार हे पूर्णपणे धार्मिक परंपरेने केले जाणार आहेत. बॉलिवूड अभिनेते अमिताभ बच्चन आणि धर्मेंद्र यांच्या शोले चित्रपटातदेखील मुश्ताक मर्चंट यांनी काम केलं होतं. पण सिनेमाची वाढलेली लांबी लक्षात घेता त्यांच्यावर चित्रित झालेले सीन सिनेमांतून वगळण्यात आले होते. या सिनेमात त्यांचा डबल रोल होता. जवळ-जवळ सोळा वर्षांपूर्वींत त्यांनी सिनेसृष्टीपासून लांब राहण पसंद केलं होतं.
संबंधित बातम्या
Panghrun Movie : महेश मांजरेकरांच्या 'पांघरुण' चित्रपटाची रिलीज डेट जाहीर; 'या' दिवशी प्रेक्षकांच्या भेटीस
Exclusive : 'सलमानला चावलेल्या सापाला...'; सलीम खान यांची माहिती
Pawankhind Movie : दिग्पाल लांजेकरांच्या 'पावनखिंड' सिनेमात चिन्मय मांडलेकर छत्रपतींच्या भूमिकेत
LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha