Katrina Kaif Wishes Salman Khan Birthday : बॉलिवूड अभिनेत्री कतरिना कैफने (Katrina Kaif) तिच्या खास मित्राला अर्थात सुपरस्टार सलमान खानला (Salman Khan) वाढदिवसाच्या खास शुभेच्छा दिल्या आहेत. कतरिना कैफने इंस्टा स्टोरीच्या माध्यमातून सलमानला शुभेच्छा दिल्या आहेत. सलमानचा अॅक्शन मोडमधला फोटो शेअर करत कतरिनाने लिहिले आहे,"सलमान खान तुला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. तुझ्यातला प्रेमळ स्वभाव आणि चेहऱ्यावरची चमक कायम अशीच राहुदे". 


कतरिनाच्या या पोस्टवरून हे स्पष्ट झाले आहे की,"लग्नानंतरदेखील सलमान आणि कतरिनाची मैत्री पूर्वीसारखीच राहणार आहे. कतरिनाचे लग्न ठरल्यापासूनच चाहत्यांमध्ये कतरिना आणि सलमानच्या मैत्रीची चर्चा होती. त्यामुळे आज सलमानच्या वाढदिवशी चाहते कतरिनाच्या पोस्टची आतुरतेने वाट पाहत होते. 



कतरिना दरवर्षी सलमानला वाढदिवसाच्या शुभेच्छा देत असते. त्यामुळेच लग्नानंतरदेखील तिने सलमानला खास शुभेच्छा दिल्या आहेत. विकी कौशल आणि कतरिना कैफच्या लग्नाला सलमान खानची हजेरी नव्हती. त्यामुळे चाहते वेगवेगळे अंदाज बांधत होते. पण 
कतरिनाच्या या पोस्टवरून हे स्पष्ट झाले आहे की, कतरिना - विकीच्या लग्नानंतरदेखील सर्व काही पूर्वीसारखेच आहे. कतरिना आणि विकी कौशल नुकतेच लग्नबंधनात अडकले होते. 


सलमान सध्या त्याच्या पनवेलमधील फार्महाऊसमध्ये आहे. कुटुंब आणि जवळच्या मित्रांसोबत तो वाढदिवस साजरा करणार आहे. सलमानला वाढदिवसाच्या एक दिवस आधीच सापाने दंश केला होता. त्यामुळे त्याला रुग्णालयातदेखील दाखल करण्यात आले होते. 


संबंधित बातम्या


Exclusive : 'सलमानला चावलेल्या सापाला...'; सलीम खान यांची माहिती


Happy Birthday Salman Khan : आज की पार्टी मेरी तरफसे... भाईजानचा वाढदिवस; सलमान कोट्यवधींचा मालक, संपत्ती ऐकून व्हाल थक्क


Happy Birthday Salman Khan : आज की पार्टी मेरी तरफसे... भाईजानचा वाढदिवस; सलमान कोट्यवधींचा मालक, संपत्ती ऐकून व्हाल थक्क


LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha