Panghrun Movie : आपल्या सुमधुर संगीतामुळे प्रेक्षकांची उत्सुकता वाढवणारा महेश मांजरेकर (Mahesh Manjrekar) यांचे दिग्दर्शन असलेला आणि झी स्टुडिओजची प्रस्तुती असलेला 'पांघरुण' हा चित्रपट येत्या 11 फेब्रुवारीला प्रेक्षकांच्या भेटीस येत आहे. अमोल बावडेकर (Amol Bavdekar) , गौरी इंगवले(Gauri Ingawale), रोहित फाळके (Rohit Phalke), विद्याधर जोशी (Vidyadhar Joshi) , सुरेखा तळवलकर (Sulekha Talwalkar) हे कलाकार या चित्रपटात प्रमुख भूमिका साकारणार आहेत. 


महेश मांजरेकर आणि झी स्टुडिओज यांच्या यशाचं एक वेगळं समीकरण आहे. काकस्पर्श,नटसम्राट यांसारख्या उत्तमोत्तम आणि यशस्वी कलाकृती हे याचं उदाहरण. आता हेच समीकरण पांघरुणमधूनही प्रेक्षकांना बघायला मिळणार आहे. स्वातंत्र्यपूर्वीचा काळ, कोकणाचं निसर्गसौंदर्य आणि तिथे घडणारी एक विलक्षण प्रेमकहाणी यामधून प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे.  या चित्रपटाचा सांगितिक ट्रेलरला (म्युझिकल ट्रेलर) प्रेक्षकांचा भरभरून प्रतिसाद मिळाला. हितेश मोडक, डॉ. सलील कुलकर्णी, पवनदीप राजन आणि अजित परब यांचं संगीत आणि वैभव जोशी यांच्या शब्दांनी सजलेल्या या गाण्यांनी प्रेक्षकांच्या मनात घर केलं. ही अनोखी गाठ आणि इलुसा हा देह या गाण्यांना तर सोशल मीडियावर लाखो व्ह्यूव्ज मिळाले.
 
11 फेब्रुवारीला प्रेक्षकांच्या भेटीला!


अनेक चित्रपट महोत्सवासाठीही या चित्रपटाची निवड झाली. 18व्या थर्ड आय एशियन फिल्म फेस्टिव्हल, 28व्या ऑस्टिन इंटरनॅशनल फिल्म फेस्टिवल, मामी इंटरनॅशनल फिल्म फेस्टिवलमध्ये पांघरुण चित्रपटाने प्रेक्षकांची मने जिंकली.  बंगळुरु आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात चित्रभारती इंडियन सिनेमा कॉम्पिटेशन या विभागात सर्वोकृष्ट भारतीय चित्रपट हा मानाचा पुरस्कारही पांघरुणने पटकावला. चित्रपटाबद्दल बोलताना दिग्दर्शक महेश मांजरेकर यांनी सांगितले की , "एखादी कलाकृती अशी असते की ती त्या दिग्दर्शकासाठी अतिशय जवळची असते. माझ्यासाठी ‘पांघरुण’ ही तशीच अतिशय जवळची फिल्म आहे. एखादी कथा प्रेक्षकांच्या आवर्जून भेटीस यावी असं अनेकदा वाटत असतं. पांघरुण ही तशीच कथा आहे. जी प्रत्येकाला आवडेल, भावेल आणि बघणारा या कथेच्या प्रेमात पडेल. अमोल, गौरी आणि रोहित यांनी कमालीच्या सुंदर भूमिका अतिशय समजून उमजून साकारल्या आहेत. प्रेक्षकांइतकाच मीही या चित्रपटाच्या प्रदर्शनाची उत्सुकतेने वाट बघत आहे."






झी स्टुडिओजचे व्यवसाय प्रमुख मंगेश कुलकर्णी म्हणाले की, “ लॉकडाऊननंतर आम्ही ‘पांडू’ हा चित्रपट घेऊन आलो आणि त्याला प्रेक्षकांचा तुफान प्रतिसाद मिळाला. त्यामुळे आमचा आत्मविश्वास दुणावला. मराठी प्रेक्षक अनेक कलाकृतींची आवर्जून वाट बघत आहेत. ‘पांघरुण’ ही त्यापैकीच एक आहे. हा चित्रपट प्रेक्षकांना एक वेगळी अनुभूती देणारा ठरेल असा विश्वास आम्हाला आहे."
येत्या ११ फेब्रुवारीला ‘पांघरुण’ संपूर्ण महाराष्ट्रातील चित्रपटगृहात प्रदर्शित होणार आहे.


संबंधित बातम्या


Happy Birthday Salman Khan : आज की पार्टी मेरी तरफसे... भाईजानचा वाढदिवस; सलमान कोट्यवधींचा मालक, संपत्ती ऐकून व्हाल थक्क


Malaika Arora Arjun Kapoor Love : 12 वर्षांनी मोठ्या मलायकासोबतच्या रिलेशनशिपमुळे अर्जुन ट्रोल, ट्रोलर्सनाला दिलं सडेतोड उत्तर


LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha