Pawankhind Movie : फर्जंद, फत्तेशिकस्तच्या यशस्वी घोडदौडनंतर दिग्पाल लांजेकर आता 'पावनखिंड' सिनेमा घेऊन प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या सिनेमाच्या माध्यमातून महाराष्ट्राचं आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांच्या सुवर्ण इतिहासातील आणखी एक सोनेरी अध्याय मोठ्या पडद्यावर पहायला मिळणार आहे. सिनेमात छत्रपतींच्या भूमिकेत अभिनेता चिन्मय मांडलेकर झळकणार आहे. 


'पावनखिंड' सिनेमाचे लेखन आणि दिग्दर्शन दिग्पाल लांजेकरने केले आहे. 21 जानेवारीला स्वराज्याच्या लढ्यातील झंझावाती महापराक्रमाची विजयगाथा पावनखिंड सिनेमाच्या माध्यमातून प्रेक्षकांना पहायला मिळणार आहे. 'मराठ्यांच्या जाळात गनीम टिकत नाही' म्हणत चिन्मय मांडलेकरचा लूक प्रेक्षकांसमोर आला आहे.





'पावनखिंड' सिनेमात महाराजांची तळपती तलवार रसिकांना पहायला मिळणार आहे. चित्रपटाच्या पोस्टरवर चिन्मयचं आजवर कधीही न दिसलेलं करारी रूप पहायला मिळत आहे. हुबेहूब शिवराय भासावेत असा पेहराव, भाळी कुमकुम तिलक, उजव्या हातात गनिमांवर तुटून पडणारी तलवार आणि पाठीमागे ज्वलंत हिंदुत्वाचा पुरस्कार करत मुसळधार पावसातही डौलानं फडकणारा भगवा झेंडा असं काहीसं शिवरायांचं चिन्मयरूप 'पावनखिंड' च्या पोस्टरवर पहायला मिळत आहे. 


सिनेमात बाजीप्रभू देशपांडे, बांदल सेना आणि मावळ्यांनी दिलेला अभूतपूर्व लढा पहायला मिळणार आहे. तसेच मराठी कलाकारांचा भलामोठा फौजफाटा या चित्रपटात पहायला मिळणार आहे. प्रेक्षकांना आता पुन्हा एकदा ऐतिहासिक सिनेमाचा अनुभव घेता येणार आहे. 


संबंधित बातम्या


Pawankhind : फर्जंद, फत्तेशिकस्तनंतर दिग्पाल लांजेकरचा 'पावनखिंड' झळकणार रुपेरी पडद्यावर


Vicky Kaushal-Katrina Kaif First Christmas : विकी - कतरिनाने साजरा केला लग्नानंतरचा पहिला नाताळ सण


सलमान खानला सर्पदंश! पनवेलमधील फार्महाऊसवरील घटना, संकट टळल्याची माहिती


LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha