Salim Khan On Salman Khan : बॉलिवूड अभिनेता सलमान खानला (Salman Khan) काल (27 डिसेंबर) पनवेलच्या फार्म हाऊसवर सापाने दंश केला होता. रिपोर्टनुसार, हा साप बिनविषारी होता.  सापाने दंश केल्यानंतर सलमान खान याच्यावर कामोठे येथील एमजीएम रुग्णालयात  उपचार करण्यात आले. सलमानचे वडील सलीम खान (Salim Khan) यांनी नुकतीच एबीपी न्यूजला दिलेल्या मुलाखतीत सलमानसोबत घडवलेल्या या घटनेबद्दल माहिती दिली आहे. 


सलीम खान‌ यांनी एबीपीला दिलेल्या मुलाखतीत सांगितले, 'रात्री सलमान त्याच्या रूममध्ये गेला. आचानक त्याचा हात दुखायला लागला. सलमानला लक्षात आले की त्याला सापाने दंश केला आहे. तो साप बिनवीषारी होता. त्यानंतर सलमानला हॉस्पिटलमध्ये जावे लागले. त्याला डॉक्टरांनी काही इंजेक्शन दिले. काही तासांनंतर त्याला घरी जाण्याची परवानगी देण्यात आली. कोणालाच कळाले नाही की तो साप सलमानच्या रूममध्ये कसा शिरला. त्या सापाला जंगलात सोडण्यात आले. पनवेल जवळील फार्म हाऊसमध्ये आणि आजुबाजूच्या गावांमध्ये सर्प दंशाच्या अनेक घटना घडतात. या भागात अनेक साप आहेत.'
 





पुढे सलीम खान यांनी सांगितले, 'फार कमी लोकांना माहित आहे की 98 टक्के साप हे बिनविषारी असतात आणि 2 टक्के साप हे विषारी असतात.'


संबंधित बातम्या


Happy Birthday Salman Khan : आज की पार्टी मेरी तरफसे... भाईजानचा वाढदिवस; सलमान कोट्यवधींचा मालक, संपत्ती ऐकून व्हाल थक्क


Malaika Arora Arjun Kapoor Love : 12 वर्षांनी मोठ्या मलायकासोबतच्या रिलेशनशिपमुळे अर्जुन ट्रोल, ट्रोलर्सनाला दिलं सडेतोड उत्तर