Shivrayancha Chhava : 'फर्जंद' (Farzand), 'फत्तेशिकस्त' (Fatteshikast), 'पावनखिंड' (Pawankhind), 'शेर शिवराज' (Sher Shivraj) आणि 'सुभेदार' (Subhedar) या सिनेमानंतर दिग्पाल लांजेकर (Digpal Lanjekar) यांचा 'शिवरायांचा छावा' (Shivrayancha Chhava) हा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. पण या सिनेमाने रिलीजआधीच इतिहास रचला आहे. न्ययॉर्कयेथील टाईम्स स्क्वेअरवर या सिनेमाचं पोस्टर झळकलं आहे. 


टाईम्स स्क्वेअरवर झळकणारा पहिला मराठी सिनेमा (Shivrayancha Chhava Teaser Featured At Times Square New york)


'शिवरायांचा छावा' या सिनेमाची जगभरातील सिनेप्रेमी प्रतीक्षा करत आहेत. सर्वत्र या सिनेमाचं कौतुक होत आहे. आता या सिनेमाचं मोशन पोस्टर न्यूयॉर्कयेथील प्रतिष्ठित असणाऱ्या टाईम्स स्क्वेअरवर झळकलं आहे. हा विक्रम करणारा 'शिवरायांचा छावा' हा पहिला मराठी सिनेमा ठरला आहे. 'शिवरांयाचा छावा' या सिनेमाचे निर्माते मल्हार पिक्टर कंपनी यांनी सोशल मीडियावर एक व्हिडीओ शेअर करत चाहत्यांनी यासंदर्भात माहिती दिली आहे. त्यांनी लिहिलं आहे,"आमचा टीझर टाईम्स स्क्वेअरवर झळकला". 






'या' दिवशी प्रदर्शित होणार 'शिवरायांचा छावा' (Shivrayancha Chhava Release Date)


'शिवरायांचा छावा' या सिनेमाची काही दिवसांपूर्वी घोषणा करण्यात आली. दिग्पाल लांजेकर यांनी एक व्हिडीओ शेअर करत या सिनेमाची घोषणा केली. त्यांनी लिहिलं होतं,"उजळला तेजाने, पुरंदराचा माथा..सह्याद्री सांगतो, पराक्रमाची गाथा..शत्रू होई परास्त, असा ज्याचा गमिनी कावा..शिवरायांचा अवतार जणू..अवतरला 'शिवरायांचा छावा". 


दिग्पाल लांजेकर यांनी पुढे लिहिलं आहे,"छत्रपती संभाजी महाराज यांच्या चरित्रावर आधारित पहिला भव्यदिव्य चित्रपट 'शिवरायांचा छावा' सादरकर्ते शिवराज अष्टकाचे लेखक-दिग्दर्शक दिग्पाल लांजेकर आणि मल्हार पिक्चर कंपनी..'शिवरायांचा छावा' 16 फेब्रुवारी 2024 पासून फक्त सिनेमागृहात". 


'शिवरायांचा छावा' या सिनेमात चिन्मय मांडलेकर आणि मृणाल कुलकर्णी मुख्य भूमिकेत असणार आहेत. छत्रपती संभाजी महाराजांचा न उलगडलेला इतिहास या सिनेमाच्या माध्यमातून प्रेक्षकांसमोर येणार आहे. तगडी स्टारकास्ट असलेला हा सिनेमा बॉक्स ऑफिसवर चांगलाच गल्ला जमवेल. येत्या 16 फेब्रुवारीला हा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला येईल. विक्रम गायकवाड, अमित देशमुख, भूषण विनतरे हे कलाकारही या सिनेमात महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहेत. 


संबंधित बातम्या


Digpal Lanjekar : "सह्याद्री सांगतो, पराक्रमाची गाथा"; 'सुभेदार' च्या यशानंतर दिग्पाल लांजेकरांचा ‘शिवरायांचा छावा!’ सिनेमा येणार प्रेक्षकांच्या भेटीस