Shivpratap Garujhep : अभिनेता अमोल कोल्हे (Amol Kolhe) यांच्या शिवप्रताप-गरुडझेप  (Shivpratap Garudjhep)

  या चित्रपटाची प्रेक्षक उत्सुकतेने वाट बघत आहेत. या चित्रपटामध्ये अमोल कोल्हे यांनी छत्रपती शिवाजी महाराजांची भूमिका साकारली आहे.  छत्रपती शिवाजी महाराजांच्या ऐतिहासिक कर्तृत्वाची महती सांगणारा 'शिवप्रताप' मालिकेतील 'गरुडझेप' हा सिनेमा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटाचे दोन टीझर प्रेक्षकांच्या भेटीस आले होते. या दोन्ही टीझरला प्रेक्षकांची पसंती मिळाली. आता या चित्रपटामधील 'बम बम भोले' हे गाणं रिलीज झालं आहे. 


अमोल कोल्हे यांनी सोशल मीडियावर 'बम बम भोले' या गाण्याची झलक शेअर करुन कॅप्शनमध्ये लिहिलं, 'वेरूळच्या घृष्णेश्वराला, रायगडच्या जगदीश्वराला नमन करून, आपल्या "शिवप्रताप - गरुडझेप " सिनेमाचं पहिलं गाणं खास आपल्यासाठी! शिवरुद्राला वंदन करून सादर करत आहोत 'शिवप्रताप गरुडझेप' मधलं पहिलं गाणं, 'बम बम भोले'.' या गण्याचे गीतकार ऋषीकेश परांजपे हे आहेत तर गाण्याला संगीत शशांक पोवार यांनी दिले आहे. प्रसिद्ध गायक कैलाश खेर यांनी हे गाणे गायले आहे. अमोल कोल्हे यांनी त्यांच्या युट्यूब चॅनलवर हे संपूर्ण गाणं शेअर केले आहे. अनेक नेटकऱ्यांनी या गाण्याला लाइक आणि कमेंट्स करुन अमोल कोल्हे यांना या आगामी चित्रपटासाठी शुभेच्छा दिल्या आहेत. 


पाहा गाणं: 



'शिवप्रताप - गरुडझेप'  या चित्रपटाचे दिग्दर्शन कार्तिक राजाराम केंढे यांनी केले आहे. तर चित्रपटाची निर्मिती ही अमोल कोल्हे यांनी केली आहे. तसेच हा सिनेमा 'जगदंब क्रिएशन' प्रस्तुत असणार आहे. रक्ताचा एकही थेंब न सांडता आपल्या बुद्धिचातुर्याच्या बळावर औरंगजेबाच्या बलाढ्य मुघल सत्तेचा पोलादी पहारा भेदून केलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या आग्र्याहून सुटकेचा प्रसंग जिवंत करणारा डॉ. अमोल कोल्हेंचा 'शिवप्रताप गरुडझेप' हा सिनेमा आहे. सप्टेंबर महिन्यामध्ये हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. अजून या चित्रपटाची रिलीज डेट जाहीर करण्यात आलेली नाही.  


Shivpratap Garujhep : 'या हिंदुस्थानानं अनुभवला होता हा शिवप्रताप'; अमोल कोल्हेंनी शेअर केला 'शिवप्रताप - गरुडझेप' चित्रपटाचा टीझर