Shivpratap Garudzep : अभिनेते अमोल कोल्हें (Amol Kolhe) यांचा 'शिवप्रताप - गरुडझेप' (Shivpratap Garudzep) हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. या चित्रपटामध्ये अमोल कोल्हे हे छत्रपती शिवाजी महाराजांची भूमिका साकारणार आहेत. या चित्रपटाचा टीझर नुकताच रिलीज झाला आहे.


अमोल कोल्हे यांनी  'शिवप्रताप - गरुडझेप' या चित्रपटाचा टीझर सोशल मीडियावर शेअर केला आहे. हा टीझसर शेअर करुन अमोल कोल्हे यांनी कॅप्शनमध्ये लिहिलं, शिवप्रताप - गरुडझेप. "सप्टेंबर 2022" चित्रपटगृहात. जय शिवराय! हर हर महादेव.' टीझर रिलीज झाल्यानंतर अनेक नेटकऱ्यांनी कमेंट करुन या टीझरला पसंती दिली आहे. 'आम्ही या चित्रपटाची उत्सुकतेने वाट पाहात आहोत.', 'हर हर महादेव' अशा कमेंट्स नेटकऱ्यांनी या टीझरला केल्या आहेत. 'शिवप्रताप - गरुडझेप'  या चित्रपटाचे दिग्दर्शन कार्तिक राजाराम केंढे यांनी केले आहे. तर चित्रपटाची निर्मिती ही अमोल कोल्हे यांनी केली आहे. तसेच हा सिनेमा 'जगदंब क्रिएशन' प्रस्तुत असणार आहे. 


पाहा टीझर:






रक्ताचा एकही थेंब न सांडता आपल्या बुद्धिचातुर्याच्या बळावर औरंगजेबाच्या बलाढ्य मुघल सत्तेचा पोलादी पहारा भेदून केलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या आग्र्याहून सुटकेचा प्रसंग जिवंत करणारा डॉ. अमोल कोल्हेंचा 'शिवप्रताप गरुडझेप' हा सिनेमा आहे. या आधी देखील अमोल कोल्हे यांनी एक टीझर रिलीज केला होता. आता चित्रपटाचा दुसरा टीझर रिलीज झाल्यानंतर प्रेक्षक या सिनेमाची प्रतीक्षा करत आहेत.


'शिवछत्रपती' आणि 'स्वराज्य रक्षक संभाजी' या मालिकांनी जगभरात अफाट लोकप्रियता मिळवली. या मालिकेतील भूमिकांमुळे छत्रपती शिवाजी महाराज आणि संभाजी महाराज म्हटलं की डॉ. अमोल कोल्हे यांचंच नाव प्रेक्षकांच्या मनात येतं. त्यामुळेच छत्रपती शिवाजी महाराजांच्या ऐतिहासिक कर्तृत्वाची महती सांगणारा 'शिवप्रताप' मालिकेतील 'गरुडझेप' हा सिनेमा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.



हेही वाचा:


Amol Kolhe : मराठी स्वाभिमानाचा अंगार...काल, आज आणि उद्याही... अमोल कोल्हेंनी केली 'शिवप्रताप-गरुडझेप' सिनेमाची घोषणा