Akshay Kumar : बॉलिवूड अभिनेता अक्षय कुमार (Akshay Kumar) एका वर्षात जवळपास 4 ते 5 चित्रपटांमध्ये काम करतो. अक्षय हा बॉलिवूडच्या सुपरहिट कलाकारांपैकी एक आहे. दरवर्षी अक्षय कुमार सर्वाधिक कर भरणारा अभिनेता ठरतो. यंदाच्या वर्षी देखील तो बॉलिवूडमधला देशातील सर्वाधिक टॅक्स भरणारा अभिनेता ठरला आहे. अक्षय कुमार हा बॉलिवूडमध्ये सर्वाधिक टॅक्स भरणारा अभिनेता आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, आयकर विभागाने अक्षय कुमारला एक सन्मान पत्र दिले आहे. हे पत्र अक्षय कुमारच्या टीमला देण्यात आले आहे.


बॉलिवूड अभिनेता अक्षय कुमार गेल्या 5 वर्षात सर्वाधिक कर भरणाऱ्यांपैकी एक अभिनेता आहे. सध्या अक्षय कुमार त्याच्या चित्रपटाच्या शूटिंगसाठी इंग्लंडमध्ये आहे. यावेळी अक्षयने किती कर भरला याचा आकडा अद्याप समोर आलेला नाही. आयकर विभागाने 2022 मध्ये मनोरंजन इंडस्ट्रीतील सर्वाधिक कर भरणारा सेलिब्रिटी म्हणून त्याचा गौरव केला आहे. 2017 मध्ये अक्षयने 29.5 कोटींचा कर भरला होता. त्या वर्षी देखील तो सर्वाधिक कर भरणारा अभिनेता ठरला होता.


अक्षय कुमारकडे चित्रपटांची रांग


अभिनेता अक्षय कुमार लवकरच ‘रक्षाबंधन’ या चित्रपटात दिसणार आहे. हा चित्रपट 11 ऑगस्ट 2022 रोजी रिलीज होणार आहे. अक्षय कुमारसोबत या चित्रपटात अभिनेत्री भूमी पेडणेकरही मुख्य भूमिकेत दिसणार आहे. ‘रक्षाबंधन’ हा चित्रपट भाऊ आणि बहिणीच्या नात्यावर आधारित आहे. या चित्रपटात तो चार बहिणी असलेल्या एका मोठ्या भावाच्या भूमिकेत दिसणार आहे. एका चित्रपटाचे चित्रीकरण संपताच त्याने दुसऱ्या चित्रपटाचे चित्रीकरण सुरू केले आहे. खिलाडी कुमार सध्या इंग्लंड जसवंत सिंह गिल यांच्या बायोपिकसाठी शूटिंग करत आहे. याशिवाय अक्षय कुमार 'राम सेतू', 'ओह माय गॉड 2', 'सेल्फी' आणि 'बडे मियाँ छोटे मियाँ' या चित्रपटांमध्येही दिसणार आहे.


अक्षय कुमार चित्रपटातून भरपूर कमाई करतो. एका चित्रपटासाठी तो कोट्यवधींमध्ये मानधन घेतो. रिपोर्ट्सनुसार, अक्षयने त्याचा 'सम्राट पृथ्वीराज'साठी सर्वाधिक मानधन घेतले होते. साधारणपणे तो एका चित्रपटासाठी आठ ते दहा कोटी घेतो, असे म्हटले जाते. त्याचे चित्रपटही बॉक्स ऑफिसवर करोडोंची कमाई करतात.


हेही वाचा :